EPFO WhatsApp Helpline Service: आता व्हॉट्सअ‍ॅप वर थेट मिळणार पीफ धारकांना मदत; इथे पहा वांद्रे, ठाणे, पुणे सह देशभरातील रिजनल ऑफिसचा हेल्पलाईन नंबर

त्यामुळे तुमच्या शंकांचं निरसन आता एका क्लिक वर होणं शक्य झाले आहे.

EPFO (Photo Credits-Facebook)

COVID-19 Pandemic मधून जाताना अनेक नोकरदार व्यक्तींना मोठा फटका बसला आहे. काहींच्या नोकरीवर गदा आली तर काहींना आर्थिक बळासाठी पीएफ अकाऊंटमधील पैसे काढणं भाग पडलं. कोविड 19 मुळे अजूनही अनेक गोष्टींबद्दल अनिश्चितता आहे. त्यामुळे आर्थिक मदतीसाठी तुम्हांला पीएफ अकाऊंट संबंधित किंवा त्यातील आर्थिक व्यवहारांबद्दल काही प्रश्न असतील तर आता थेट तुमच्या पीएफ अकाऊंटच्या रिजनल ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही. EPFO ने कोविड 19 जागतिक संकटाचा धोका पाहता पीएफ अकाऊंट धारकांसाठी विशेष व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस (WhatsApp Helpline Service) सुरू केली आहे. देशातील सार्‍या 138 कार्यालयांसाठी ही व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिस खुली करण्यात आली आहे. त्यामुळे तुमच्या शंकांचं निरसन आता एका क्लिक वर होणं शक्य झाले आहे.

महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, औरंगाबाद सह महत्त्वाच्या शहरांमध्ये नोकरदारांसाठी त्यांच्या पीएफ अकाऊंटबाबत माहिती उपलब्ध करण्यासाठी रिजनल ऑफिस आहे. मात्र सध्या कोविडचा धोका पाहाता तेथे जाऊन समस्या मांडण्यापेक्षा त्या ऑफिसच्या रिजनल ऑफिसचा नंबर पाहून व्हॉट्सअ‍ॅपवरच त्यांची मदत घेऊ शकता. त्यासाठी इथे पहा तुमच्या रिजनल ऑफिसचा हेल्पलाईन नंबर.

केंद्रीय श्रम मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, जगातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपची मदत घेत आता ते त्यांच्या अकाऊंट होल्डर्स सोबत बोलू शकणार आहे. यामध्ये त्यांच्या मनातील शंका, पीएफ संबंधी प्रश्न, समस्या यांचे निरसन वन टू वन करणं शक्य होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन सर्व्हिसमुळे आता सोशल डिस्टंसिंग पाळून ग्राहकांच्या समस्या सोडवल्या जाऊ शकता. COVID-19 Outbreak चं कारण देत PF अकाऊंट मधून कसे काढाल पैसे? इथे पहा सविस्तर माहिती

प्रत्येक रिजनल ऑफिसमध्ये सध्या पीएफ अकाऊंट होल्डर्सच्या समस्यांचे निरसन करण्यासाठी एक्सपर्टची टीम काम करत आहे. यामुळे अनेकांची ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या समस्या मांडणं याची फेरी वाचणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप हेल्पलाईन नंबर सोबतच EPFiGMS,ईपीएफओची फेसबूक, ट्वीटर अकाऊंटस यांच्याद्वारा देखील मदत घेतली जाऊ शकते.