EPFO Alert: सावधान! सोशल मीडियावर वैयक्तीक माहिती सामायिक करणे टाळा; ईपीएफओने दिला सावधानतेचा इशारा
जसे की, आपला पीएफ क्रमांक, पॅन कार्ड, आधार कार्ड यांसारख्या अथवा आपल्या बँकेशी संबंधीत कोणत्याही प्रकारची माहिती आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरुन सामायिक करु नये.
ऑनलाई फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (Employees' Provident Fund Organization) म्हणजेच ईपीएफओ (EPFO) ने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. ईपीएफओने स्पष्टपणे सांगितले आहे की, नागरिकांनी म्हणजेच सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर कोणत्याही प्रकारची वैयक्ती माहिती सामायिक करु नये. जसे की, आपला पीएफ क्रमांक, पॅन कार्ड, आधार कार्ड यांसारख्या अथवा आपल्या बँकेशी संबंधीत कोणत्याही प्रकारची माहिती आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवरुन सामायिक करु नये.
ईपीएफओने स्पष्ट शब्दात म्हटले आहे की, घोटाळेबाज अथवा सायबर गुन्हेगार जेव्हा EPFO कडून आधार, पॅन, UAN, बँक खाती किंवा OTP सारख्या सेवांच्या बदल्यात वैयक्तिक माहितीची मागणी करतात तेव्हा लोकांनी अशा प्रकारच्या कोणत्याही अमिष अथवा मदतीच्या याचनेला फसू नका. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन निर्णय घेणे टाळा. (हेही वाचा, केंद्र सरकार कडून EPFO ग्राहकांना 2021-22 साठी 8.1% व्याजदर निश्चित; 40 वर्षांतील नीच्चांकी दर)
नागरिकांना सावधानतेचा सल्ला देताना ईपीएफओने म्हटले आहे की, ते आपल्या ग्राहकांना किंवा नागरिकांना कधीही फोन, सोशल मीडिया, व्हॉट्सअॅप इत्यादीद्वारे वैयक्तिक माहितीची विनंती करत नाहीत. ईपीएफओने याबाबत एक ट्विटही केले आहे. ज्यात पुन्हा उल्लेख केला आहेकी, "EPFO कधीही त्यांच्या सदस्यांना त्यांचे वैयक्तिक तपशील जसे की आधार, पॅन शेअर करण्यास सांगत नाही.
ईपीएफओने आपल्या सदस्यांना वैयक्तिक माहितीची विनंती करणार्या अवांछित कॉल किंवा संदेशांना उत्तर देऊ नये असा इशारा देखील दिला आहे. ईपीएफओ सदस्यांना उद्देशून म्हटले आहे की, त्यांना त्यांचे ऑनलाइन दस्तऐवज कसे सुरक्षित ठेवायचे हे माहित असणे आवश्यक आहे. डिजीलॉकर काही EPFO सेवांमध्ये प्रवेश करण्याची परवानगी देतो याची त्यांनी माहिती करुन घ्यावी. डिजीलॉकर हे कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे शेअरिंग, स्टोरेज आणि पडताळणीसाठी एक सुरक्षित क्लाउड-आधारित प्लॅटफॉर्म आहे. हे अॅप iOS आणि Android गॅझेटवर डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे, असेही ईपीएफओने म्हटले आहे.