तुम्हाला LPG Cylinder वर Subsidy मिळते की नाही? काही मिनिटांत करू शकता चेक; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
अनुदान उपलब्ध नसण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे केवायसीशी संबंधित कागदपत्रे अद्ययावत न करणे.
घरगुती गॅस सिलिंडर खरेदी केल्यानंतर त्यावर त्यांना अनुदान मिळत आहे की नाही याची चिंता अनेक नागरिकांना पडत असते. कारण, बर्याच वेळा विशिष्ट रकमेपेक्षा कमी व्यवहार एसएमएसद्वारे प्राप्त होत नाहीत. यामुळे बरेच लोक अस्वस्थ किंवा गोंधळून जातात. तथापि, आपल्या एलपीजी कंपनीच्या वेबसाइटद्वारे आपल्याला नियमितपणे अनुदानाची रक्कम मिळत आहे की, नाही हे तुम्ही सहज तपासू शकता. जर आपल्याला अनुदानाची रक्कम मिळत असेल तर आपल्याला किती बुकिंगवर, किती रुपयांचे अनुदान मिळाले, यासंबंधित माहितीदेखील मिळू शकेल. तुम्हाला LPG Cylinder वर Subsidy मिळते की नाही? हे जाणून घेण्यासाठी खालील प्रक्रियेचा वापर करा. (वाचा - SBI बॅंकेत Jan Dhan account ग्राहकांना मिळणार 2 लाख रूपयांचा Accidental Insurance Benefits;मात्र त्यासाठी पात्र होण्याकरिता केवळ 'इतकंच' करा)
- कोणत्याही ब्राउझरमध्ये आपली एलपीजी सेवा प्रदाता कंपनी वेबसाइट उघडा.
- जर आपण आधीपासूनच वेबसाइटवर खाते तयार केले असेल तर लॉगिन आयडी आणि संकेतशब्दाने लॉग इन करा.
- जर आपण एखादे खाते तयार केले नसेल तर एलपीजी आयडी, ग्राहक क्रमांक आणि इतर माहितीच्या सहाय्याने खाते तयार करा आणि त्यानंतर लॉग इन करा.
लॉग इन केल्यानंतर तुम्हाला 'View Cylinder Booking History' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- येथे तुम्हाला अनुदानाशी संबंधित संपूर्ण माहिती मिळेल.
जर आपल्याला अनुदान मिळत नसेल तर आपल्याला आपल्या एलपीजी डीलरशी संपर्क साधावा लागेल. अनुदान उपलब्ध नसण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यातील सर्वात मोठे कारण म्हणजे केवायसीशी संबंधित कागदपत्रे अद्ययावत न करणे. यामध्ये, जर तुमचा आधार एलपीजी आयडीशी जोडलेला नसेल तर तुमचे अनुदान उपलब्ध होणार नाही. त्याचप्रमाणे, जर तुमचे आधार कार्ड दिलेल्या बँक खात्याशी लिंक नसेल तर तुम्हाला अनुदानाचा लाभ मिळणार नाही.
या व्यतिरिक्त, जर कुटुंबातील पती-पत्नीचे एकूण वार्षिक उत्पन्न 10 लाखाहून अधिक असेल तर तुम्हाला एलपीजी सिलिंडरवरील अनुदानाचा लाभ मिळणार नाही. एखाद्याचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये असेल तर त्याला अनुदान मिळेल. मात्र, त्या व्यक्तीच्या लग्नानंतर त्याच्या पत्नीचे उत्पन्न जर 5 लाख रुपये असेल तर दोघांचे उत्पन्न 10 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला अनुदान मिळणार नाही.