CoWin : कोविनबाबत सरकारची मोठी घोषणा; जाणून घ्या तुमचाही होवू शकतो विशेष फायदा

आता कोविन हे पोर्टल फक्त कोव्हिड लसीकरणाच्या नोंदणीसाठीचं नाही तर भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम आणि इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे.

CoWIN Portal (Photo Credits: Internet)

भारतातील लसीकरण(Vaccination) प्रक्रियेसाठी लसी संबंधीत बुकिंग (Booking) करणं अनिवार्य आहे. देशातील कोविन (CoWin) पोर्टलवरुन लसीकरणासाठी बुकींक करण्याची सुविधा भारत सरकारकडून (Indian Government) करण्यात आली होती. लस (Vaccine) बुकिंग करण्याची ही प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. अगदी सामान्य माणूस आपल्या मोबाईल (Mobile) फोनवरुन सहज ही बुकींग करता येते. तसेच हे कोविन पोर्टल मराठी (Marathi),पंजाबी (Punjabi), तेलगू (Telagu), हिंदी (Hindi) , मल्याळम (Malyalam), गुजराती (Gujrati), आसामी (Assamiya), बंगाली (Bangla), कन्नड (Kannada), उडिया या प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध आहे. कोव्हिड (Covid) दरम्यान लसीची बुकींग करण्यासाठी भारतीयांनी सर्वाधिक कोविनचा या पोर्टलचा वापर केलेला आहे. कोविनचा सहज वापर आणि उपयुक्तता बघता सरकारने कोविन पोर्टलबाबत मोठी घोषणा केली आहे.

 

कोविड लसीकरणाची नोंद तसेच इतर कामकाज आहेत तसे ठेवत केंद्र सरकारने कोविन या पोर्टलमध्ये काही महत्वाचे बदल करण्याचे ठरवले आहे. आता कोविन हे पोर्टल फक्त कोव्हिड लसीकरणाच्या नोंदणीसाठीचं नाही तर भारताच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम आणि इतर राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांसाठी वापरण्यात येणार आहे. ज्यामुळे भारतीयांना वैद्यकीय सुविधांचा लाभ घेणं अगदी सहज शक्य होणार आहे.  Co-WIN ला सार्वत्रिक लसीकरण, रक्तदानासाठी (Blood Donation) एक व्यासपीठ म्हणून वापरण्यात येणार आहे. तसेच अवयवदानासाठी देखील CoWIN चा वापर करण्यात येणार आहे, असे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आर.एस. शर्मा यांनी सांगितले आहे. (हे ही वाचा:-P Gopinathan Passed Away : गांधीवादी नेते पी गोपीनाथन नायर यांचं निधन, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक बड्या नेत्याकडून भावपूर्ण श्रध्दांजली)

 

CoWin आता सार्वत्रिक लसीकरणासाठी, रक्तदानासाठी आणि कदाचित थोड्या वेळाने अवयवदान प्लॅटफॉर्मसाठी देखील एक व्यासपीठ बनण्याचा आमचा मानस आहे. यावर आम्ही काम करण्यास सुरुवात केली आहे, असं ANI ला दिलेल्या मुलाखतीत डॉ. आर.एस. शर्मा (Dr. R.S Sharma) सांगितले आहे. कोविन पोर्टल असलायचा कोट्यावधी लोकांना फायदा झाला आहे.  आपल्याला यासंदर्भात अधिक माहिती हवी असल्यास आपण कोविन हेल्पलाईन CoWin Helpline) नंबर 1075 वर कॉल करून माहिती मिळवू शकता.