Covid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया?

भारतात Co-WIN System द्वारा पार पडणारी कोविड 19 लसीकरणाची प्रक्रिया कशी असेल? कुठे, कधी तुम्हांला लस मिळू शकते आणि त्यासाठी Co-WIN App वर नेमकं रजिस्ट्रेशन कसं कराल? घ्या जाणून.

Vaccination In India| Photo Credits: Pixabay.com

भारतामध्ये आज Covaxin, Covishield या दोन कोविड लसींना (Covid 19 Vaccine) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये टप्प्याटप्प्याने लसीकरणाला सुरूवात होणार आहे. या लसीकरण मोहिमेमध्ये सहभागी होण्यासाठी प्रत्येकाला स्वतःची नोंदणी करून तुमचा कोविडचा डोस निश्चित करायचा आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यांत आरोग्य कर्मचारी, पोलिस, डॉक्टर यांचा समावेश केला जाणार आहे त्यानंतर सहव्याधी असणारे नागरिक आणि टप्प्याने टप्प्याने उर्वरित जनतेला लस दिली जाईल. पण तुमची या कोविड 19 लसीकरण मोहिमेमध्ये फसवणूक होऊ नये म्हणून सरकारने अंमलंबलेली प्रक्रियाच पार पाडणं फायदेशीर आहे. मग जाणून घ्या आता Co-WIN System द्वारा पार पडणारी ही सुरक्षित कोविड 19 लसीकरणाची प्रक्रिया कशी असेल? कुठे, कधी तुम्हांला लस मिळू शकते आणि त्यासाठी Co-WIN वर नेमकं रजिस्ट्रेशन कसं कराल? Covaxin, Covishield Vaccines 110% सुरक्षित; कोविड 19 लसी लोकांना नापुंसक बनवत असल्याच्या दाव्याला DCGI Dr VG Somani यांनी फेटाळलं (Watch Video).

भारतामध्ये कोविड19 लसीकरणामध्ये सहभागी होण्यासाठी Co-WIN  वर रजिस्ट्रेशन कसं कराल?

COVID-19 Vaccination Begin in India (Photo Credits: Twitter)

भारतामध्ये लसीकरणाची प्रक्रिया टप्प्या टप्प्याने होणार आहे. त्याचि माहिती वेळोवेळी सरकारी यंत्रणेद्वारा दिली जाणार आहे. हे लसीकरण कुणावरही बंधनकारक नसेल असे काही दिवसांपूर्वी आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तुमची लस घेण्याचि इच्छा असेल तर ती सुरक्षितपणे घेण्यासाठी तुम्हांला को विन अ‍ॅप वर रजिस्ट्रेशन करणं गरजेचे आहे. आरोग्य यंत्रणांकडून दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत को विन वर 75 लाख नागरिकांनी रजिस्ट्रेशन केले आहे.