IPL Auction 2025 Live

CGHS लाभार्थ्यांना आयडी Ayushman Bharat ID सोबत जोडणं बंधनकारक; 30 एप्रिल पर्यंतचा अवधी

मंत्रालयाच्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2024 पासून CGHS लाभार्थी ID ABHA ID शी लिंक करणे अनिवार्य असेल.

Online Medicines | Representational image (Photo Credits: pixabay)

केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांना सेंट्रल गर्व्हमेंट हेल्थ स्कीमचा (Central Government Health Scheme) लाभ मिळतो. यामध्ये केंद्रीय सरकारी कर्मचार्‍यांना हॉस्पिटल मध्ये कॅशलेस ट्रीटमेंट मिळते. स्वास्थ्य मंत्रालय आणि परिवार कल्याण कडून आता केंद्र सरकार स्वास्थ्य योजना (CGHS) लाभार्थ्यांना त्यांचं सीजीएचएस कार्ड आयुष्मान भारत स्वास्थ्य अकाऊंट आयडी (Ayushman Bharat Health Account ID) सोबत जोडणं बंधनकारक केले आहे. मंत्रालयाकडून त्याबाबतचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांच्या निर्देशानुसार आता सार्‍या सीजीएचएस लाभार्थ्यांना आपलं सीजीएचएस आईडी आयुष्मान भारत स्वास्थ्य अकाऊंट आईडी सोबत लिंक करणं गरजेचे आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2024 पासून CGHS लाभार्थी ID ABHA ID शी लिंक करणे अनिवार्य असेल. आयडी लिंक करण्यासाठी लाभार्थ्यांकडे 30 दिवस आहेत. CGHS लाभार्थी ID ABHA ID शी जोडण्याचे उद्दिष्ट CGHS लाभार्थ्यांची डिजिटल आरोग्य ओळख देणे आणि त्यांचे आरोग्य रेकॉर्ड डिजिटल पद्धतीने जमा करणे हे आहे. नक्की वाचा: Niti Aayog Report: महाराष्ट्रातील 24.40 टक्के कुटुंब दारिद्र्यरेषेखाली, नीती आयोगाच्या अहवालावरुन गोंधळ .

केंद्र सरकारची आरोग्य योजना (CGHS) केंद्र सरकारने 1954 मध्ये सुरू केली. या योजनेचा उद्देश सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आरोग्य सेवा देणे आहे. सध्या 75 शहरांमध्ये 41 लाखाहून अधिक लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.