RBI Rules for Mutilated Note: फाटलेल्या आणि भिजलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकतात का? काय आहे RBI चे नियम? जाणून घ्या

2009 मध्ये, RBI (RBI Rules Regarding Motilated Note) ने फाटलेल्या नोटांच्या नियमाबाबत एक मोठा बदल केला होता, ज्यामध्ये तुम्ही फाटलेल्या नोटा तीन परिस्थितींमध्ये बदलू शकता.

Money. Image used for representational purpose | (Photo Credits: PTI)

RBI Rules for Mutilated Note: बर्‍याच वेळा आपल्याकडील चलनी नोटा फाडल्या जातात किंवा आपल्याला दुसऱ्यांकडून फाटलेल्या नोटा मिळतात. अशा परिस्थितीत समोरची व्यक्ती चलनी नोटा घेण्यास नकार देते. कपडे धुताना बऱ्याचदा पैसे खिशात तसेच राहतात. त्यामुळे या नोटा ओल्या होतात किंवा फाटतात. अशा प्रकारच्या नोटांचे काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. चलनी नोटा जितक्या मोठ्या असतील तितका तोटा होण्याचा धोका जास्त असतो. अशा परिस्थितीत, काळजी करण्याची गरज नाही, तुम्ही तुमच्या फाटलेल्या नोटा बँकांमधून सहजपणे बदलू शकता.

बँका तुम्हाला नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाहीत. केंद्रीय बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (Reserve Bank of India) ने फाटलेल्या नोटा बदलण्याबाबत आपले नियम स्पष्ट केले आहेत. जर तुम्हाला कोणतीही फाटलेली नोट बदलायची असेल, तर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून फाटलेल्या किंवा भिजलेल्या नोटा सहज बदलू शकता. (वाचा - Indian Railways: भारतीय रेल्वेची मोठी घोषणा! आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना पुन्हा देणार मोठी भेट, जाणून घ्या सविस्तर)

आरबीआयने फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी केला 'हा' नियम -

2009 मध्ये, RBI (RBI Rules Regarding Mutilated Note) ने फाटलेल्या नोटांच्या नियमाबाबत एक मोठा बदल केला होता, ज्यामध्ये तुम्ही फाटलेल्या नोटा तीन परिस्थितींमध्ये बदलू शकता. तुम्ही RBI कार्यालयात किंवा अधिकृत बँक शाखांमध्ये नोटा बदलू शकता. नोटा बदलण्यासाठी बँका तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारू शकत नाहीत. परंतु, एखाद्या व्यक्तीने जाणूनबुजून नोट जाळली किंवा खराब केली असेल, तर बँक नोट बदलण्यास नकार देऊ शकते.

जर 2000 च्या नोटेची लांबी 88cm असेल तर तुम्हाला त्याचे पूर्ण पैसे मिळतील. दुसरीकडे, जर तुमच्याकडे नोटेचा यापेक्षा कमी तुकडा असेल तर, तुम्हाला 2000 रुपयांच्या नोटेऐवजी फक्त 1000 रुपये मिळतील. याशिवाय जर एटीएममधून खराब नोट निघाली असेल तर तुम्ही एटीएम व्यवहाराचा पुरावा दाखवून नोट बदलू शकता. पुरावा म्हणून, बँक एटीएम मशीनमधून संदेश किंवा चिट दाखवू शकते. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

ओल्या नोट्स संबंधित नियम -

जर लोक सहसा ओल्या नोटला वाळवतात आणि नंतर वापरतात. पण, नोटेचा रंग खराब झाला असेल, तर तुम्ही ती नोट बँकेत बदलून घेऊ शकता. परंतु, लक्षात ठेवा नोट बँकेत बदलण्यासाठी, त्यात छापलेले अंक स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहेत.