नोकरीला कंटाळलात? मग स्वत:चे सरकारमान्य Post-Office सुरु करा, कमवा बक्कळ पैसा

एकदा का ही फ्रँचायजी मिळाली की, पहिल्या दिवसापासून इनकम सुरु. आयडिया पटलीच आहे तर, मग घ्या जाणून. सविस्तर..

Business opportunity with Post Office | (Photo credit: archived, edited, representative image)

Business opportunity: छे.. नोकरीत आता काही राम राहिला नाही. हातभर मेहनत करुन टीचभर पगार कमवायचा. तुटपूंज्या पगारात कसं भागवायचं. ते गुलामगिरीचं जगणं नकोसं झालयं. नोकरीला व्यवसाय ऐकत नाही. नोकरीपेक्षा धंदा कधीही सरस! ही वाक्ये अनेकजण अनेकदा फेकत असतात. कदाचित तुम्ही ऐकली असतील किंवा तुम्हीही वापरली असतील. म्हणजे एकूणच काय तर, तुम्ही नोकरीला कंटाळला आहात. किंवा नोकरीच मिळत नाही म्हणून वैतागला आहेत. तर, मग विचार कसला करताय? आम्ही सूचवतो पर्याय. तुम्ही थेट पोस्ट ऑफीस (Post-Office) सुरु करा. कदाचित आश्चर्य वाटले असेल, कारण Post-Office असं कोणा व्यक्तीनं सुरु केल्याचं आपण कधी पाहिलंच नाही. पण, घाबरु नका आम्ही तुम्हाला कोणताही कायदा मोडायला सांगत नाही आहोत. तर, सरकारमान्य पोस्ट ऑफीस (Governmental Post Office) आता कुणालाही सुरु करता येणार आहे. फक्त त्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियम आणि अटींच्या निकषात तुम्ही बसला पाहिजे. एकदा का तुम्ही हे सर्व निकष पूर्ण केले की, तुम्ही स्वत: Post-Office सुरु करायला रिकामे झालात. तुम्हाला Post-Office सुरु कारायचे म्हणजे पोस्ट ऑफिस फ्रँचायजी (Post Office Franchise) घ्यावी लागणार आहे. एकदा का ही फ्रँचायजी मिळाली की, पहिल्या दिवसापासून इनकम सुरु. आयडिया पटलीच आहे तर, मग घ्या जाणून. सविस्तर..

कशी घ्याल Post-Office फ्रँचायजी?

जर तुम्ही पोस्ट ऑफीस फ्रँचायजी घेऊ इच्छित असाल तर, त्यासाठी आपल्याला प्रथम 5000 रुपये सुरक्षा निधी (Security Amount) जमा करावी लागेल. ही रक्कम फ्रेंचायचीकडून एका दिवसात केल्या जाणाऱ्या फायनान्शियल ट्रान्जेक्शन (Financial Transactions)संभाव्य कमाल पातळीवर(Possible Maximum Level) अधारीत आहे. कालांतराने ही रक्कम दैनंदिन मोबदल्यानुसार वाढू शकते. सिक्योरिटी डिपॉझिट (अनामत रक्कम) NSC च्या धर्तीवर घेतली जाते. फ्रँचायजी घेणाऱ्याची निवड विभागीय निवड प्रमुख (Selection divisional head) करतो. अर्ज मिळाल्यानंतर 14 दिवसांच्या आत र ASP/SD च्या रोपोर्टवर आधारीत निवड केली जाते.

 Post-Office फ्रँचायजी घेण्यासाठी या आहेत अटी

फ्रँचायजी घेण्यासाठी तुम्हाला काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यासाठी फ्रँचायजी घेण्यासाठी उपलब्ध असलेला अर्ज भरुन द्या. अर्जाद्वारे तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला इंडिया पोस्ट सोबत एक MoU साईन करावे लागेल. इंडिया पोस्टाच्या नियमानुसार फ्रँचायजी घेणाऱ्या व्यक्तिचे किमान शिक्षण 8 पास असणे आवश्यक आहे. तसेच, त्या व्यक्तिने वयाची 18 वर्षे पूर्ण केलेली असायला हवीत. महत्त्वाचे असे की, पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी कोणही घेऊ शकतो. यात संस्था, कार्यालयं, यांच्याशिवाय दुकानदार, छोटे व्यवसायिक, हेसुद्धा फ्रँचायजी घेण्यासाठी अर्ज करु शकतात. (हेही वाचा, पाच लाख रुपये जिंका! SBI ग्राहकासाठी मोठी संधी, कसा कराल अर्ज?)

फ्रँचायजी घेतल्यावर कशी होणार कमाई?

पोस्ट ऑफीस फ्रँचायजी घेतल्यावर होणारी कमाई ही कमीशनवर होते. त्यासाठी पोस्ट ऑफिसकडून मिळणारे प्रोडॉक्ट आणि सेवा दिली जाते. सर्व सेवांवर कमीशन दिले जाते. MOU मध्ये हे कमीशन आगोदरच निश्चित केले जाते. ती साधारण अशी असते-

दरम्यान, पोस्ट ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयसुद्धा फ्रँचायजी घेण्यासाठी अर्ज करु शकतात. मात्र, त्यांच्यासाठी अट अशी की, कर्मचारी काम करत असलेल्या विभागात त्याच्या कुटुंबातील व्यक्तिला फ्रँचायजी मिळणार नाही. तसेच, या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील व्यक्ती जसे की, पत्नी, मुले फ्रँचायजीसाठी अर्ज करु शकतात.