PM Awas Yojna: प्रधानमंत्री आवास योजनेचा कसा होतो फायदा? जाणून घ्या सविस्तर
कोरोना व्हायरसमुळे या स्कीमची डेडलाईन 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
आपले स्वत:चे हक्काचे असे घर असावे असे स्वप्न कोणाचे नसते. त्यासाठी वेळ पडली तर स्वत:च्या पोटाला चिमटे लावून प्रत्येक व्यक्ती अविरत प्रयत्न करतो. आपल्या कुटूंबाला सुरक्षित आणि आरामदायी आयुष्य जगता यावे यासाठी धडपड करत असतो. या सर्वाचा विचार करुन केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojna) आणली. ज्यामुळे घर घेण्याची इच्छा बाळगणा-या लोकांना या योजनेचा फायदा घेता येईल. मात्र अनेक जणांना आतापर्यंत या योजनेचा लाभ कोणाला व कसा होतो याबाबत माहिती नाही. कोरोना व्हायरसमुळे या स्कीमची डेडलाईन 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
या योजनेत ग्राहकांना लाखो रुपयांचा फायदा होईल. यात सरकारने 4 वर्ग बनवले आहेत. यात इकोनॉमिकली वीकर सेक्शन (EWS), लोअर इनकम ग्रुप (LIG), लोअर इनकम ग्रुप (LIG) आणि मिडिल इनकम ग्रुप 2 (MIG2) असे वर्गीकरण करण्यात आले आहे. यात EWS आणि LIG मध्ये 3 ते 6 लाखापर्यंत लोन मिळू शकते. तर MIG I मध्ये 6 ते 12 लाख, MIG II मध्ये 12 ते 18 लाखापर्यंत लोन मिळू शकते.हेदेखील वाचा- Aadhar Card वरील डिजिटल पद्धतीची सही पडताळून पहाण्यासाठी 'या' स्टेप्स फॉलो करा
यासाठी रजिस्ट्रेशन कसे कराल?
सर्वात आधी rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx या संकेतस्थळाला भेट द्या.
जर तुमचे रजिस्ट्रेशन असेल तर तो नंबर एन्टर करा.
त्यासंबंधीची सर्व माहिती तुमच्यासमोर येईल.
रजिस्ट्रेशन नसेल तर Advance सर्च करा
फॉर्म भरून मग पुन्हा सर्च करा.
जर तुमचे नाव PMAY-G यादीत असेल तर तुम्हाला सर्व माहिती मिळेल.
कोणाला किती मिळतो सब्सिडी
PMAY : अधिकतम 2.67 लाख रुपयांची सब्सिडी
EWS/LIG : 6.5% सब्सिडी
MIG-I : 4% ची क्रेडिट लिंक सब्सिडी
MIG-II : 3% ची क्रेडिट लिंक सब्सिडी
सरकार PMAY अंतर्गत लोकांची ओळख करुन घेण्यासाठी Census 2011 चे जनगणनेचे आकडे घेते.त्यामुळे यासंबंधीची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अधिकृत वेबसाईटला अवश्य भेट द्या.