Bank Holidays in July 2025: जुलै महिन्यात 13 दिवस बंद राहणार बँका; बँकेत जाण्यापूर्वी तपासा सुट्ट्यांची संपूर्ण यादी
पुढील महिन्यात राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांमुळे बँकांचे काम एकूण 13 दिवस ठप्प राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि शनिवारी बँक बंद असते, तर प्रत्येक रविवारी देखील साप्ताहिक सुट्टी असते. याशिवाय, सणांच्या दिवशी बँकां बंद असतात.
Bank Holidays in July 2025: जून महिन्याप्रमाणेच जुलै 2025 महिन्यातही बँकांना अनेक सुट्ट्या (Bank Holidays) आहेत. जुलै महिन्यात बँकांमध्ये 10 दिवसांपेक्षा जास्त सुट्ट्या असणार आहेत. खरंतर, येत्या महिन्यात अनेक सण येत आहेत, त्यामुळे सार्वजनिक सुट्ट्या असतील. तथापि, या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दिवशी असतात. अशा परिस्थितीत, बँकेत जाण्यापूर्वी, एकदा बँकांच्या सुट्ट्यांची यादी नक्की तपासा आणि सुट्ट्यांनुसार तुमच्या कामाचे नियोजन करा.
बँकेला सुट्टी असली तरी तुम्ही मोबाईल बँकिंग, एटीएम किंवा इंटरनेट बँकिंग सुविधेद्वारे आर्थिक किंवा गैर-आर्थिक व्यवहार करू शकता. परंतु काही कामे अशी आहेत ज्यासाठी बँक शाखेत जाणे आवश्यक आहे. जुलै महिन्यात बँका कधी आणि कुठे बंद राहणार आहेत ते जाणून घ्या. (हेही वाचा - Voter ID Cards Within 15 Days: आता मतदार ओळखपत्र मिळणार केवळ 15 दिवसांत; जाणून घ्या कसा कराल ऑनलाइन अर्ज व तपासाल वितरणाचा मागोवा)
जुलैमध्ये एकूण 13 दिवस बँका बंद राहतील -
पुढील महिन्यात राष्ट्रीय आणि प्रादेशिक सुट्ट्यांमुळे बँकांचे काम एकूण 13 दिवस ठप्प राहील. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) नुसार, दर महिन्याच्या दुसऱ्या आणि शनिवारी बँक बंद असते, तर प्रत्येक रविवारी देखील साप्ताहिक सुट्टी असते. याशिवाय, सणांच्या दिवशी बँकां बंद असतात.
जुलै महिन्यातील सुट्ट्यांची संपूर्ण यादी -
- 3 जुलै: खर्ची पूजा निमित्त आगरतळामधील सर्व बँका बंद राहतील.
- 5 जुलै: गुरु हरगोबिंद जी यांच्या जयंती निमित्त बँका बंद राहतील.
- 6 जुलै: रविवार साप्ताहिक सुट्टी
- 12 जुलै: महिन्याचा दुसरा शनिवार
- 13 जुलै: रविवार साप्ताहिक सुट्टी
- 14 जुलै: बेह देंखलाम निमित्त सर्व बँका बंद राहतील.
- 16 जुलै: हरेला सण निमित्त बँका बंद राहतील.
- 17 जुलै: यू तिरोट सिंह यांच्या पुण्यतिथी निमित्त शिलाँगमधील सर्व बँका बंद राहतील.
- 19 जुलै: केर पूजा निमित्त आगरतळा बंद राहतील.
- 20 जुलै: रविवार साप्ताहिक सुट्टी
- 26 जुलै: महिन्याचा चौथा शनिवार
- 27 जुलै: रविवार साप्ताहिक सुट्टी
- 28 जुलै: द्रुकपा त्शे-जीसाठी गंगटोक बंद राहील.
अशा परिस्थितीत, जर तुम्हाला जुलैमध्ये बँकेशी संबंधित कोणतेही महत्त्वाचे काम असेल, जसे की चेक जमा करणे, कर्जाशी संबंधित कागदपत्रे सादर करणे किंवा पैसे काढणे, तर त्याचे आगाऊ नियोजन करा. तथापि, ऑनलाइन बँकिंग, UPI आणि ATM आणि इंटरनेट बँकिंगची सुविधा सुरू राहील.
(The above story first appeared on LatestLY on Aug 17, 1465 05:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

