31 मार्चला सरकारी बॅंका रविवारी देखील खुल्या राहणार; ग्राहकांसाठी RTGS आणि NEFT च्या वेळेत वाढ
बॅंकांच्या शाखांमध्ये देण्या-घेण्याचे व्यवहार 30 मार्च दिवशी रात्री 8 वाजल्यापासून 31 मार्च दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील.
FY2018-2019: यंदाच्या आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस 31 मार्च रविवारी आल्याने भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (Reserve Bank Of India) कामकाज आणि बॅंक ट्रान्झॅक्शनसाठी विकेंडला म्हणजेच 30, 31मार्च दिवशी सरकारी बॅंका सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा रविवार असूनही 31 मार्चला बॅंक सुरू राहणार आहे. आरबीआयने एका परिपत्रक जाहीर करून बॅंकांना याबाबतची माहिती दिली आहे.
RBI ट्विट
30 आणि 31 मार्च दिवशी पे अॅन्ड अकाऊंट खाती सुरू राहणार असल्याने 31 मार्च दिवशी सरकारी बॅंका खुल्या ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बॅंकांच्या शाखांमध्ये देण्या-घेण्याचे व्यवहार 30 मार्च दिवशी रात्री 8 वाजल्यापासून 31 मार्च दिवशी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. RTGS आणि NEFT सोबत इलेक्ट्रॉनिक देवाण घेवाण करण्यासाठीही ग्राहकांना 30 आणि 31 मार्च दिवशी वेळ मर्यादा वाढवून देण्यात आली आहे.