IPL Auction 2025 Live

Ayodhya Ram Mandir Aarti Passes: अयोद्धा राम मंदिरात ऑनलाईन, ऑफलाईन आरती पास देण्यास सुरूवात; इथे पहा दर्शन, आरतीच्या वेळा आणि पास कसा मिळवाल?

'आरती' पास मिळविण्यासाठी, भक्तांना वैध सरकारी ओळख पुराव्यासह 'आरती' सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी मंदिर कॅम्प ऑफिसमध्ये पोहोचावे लागेल.

ram Mandir | Twitter

हिंदू धर्मीयांसाठी आस्थेचं स्थान असलेलं श्री राम जन्मभूमी मंदिर (Ram Janmabhoomi Temple) अखेर प्रत्यक्षात उतरलं आहे. 22 जानेवारी 2024 दिवशी या मंदिरामध्ये रामलल्लांच्या मूर्तीची विधिवत प्राण प्रतिष्ठा होणार आहे. समस्त हिंदू धर्मीयांसाठी हा क्षण मोठा आनंदाचा असणार आहे. मंदिराच्या गर्भगृहामध्ये रामलल्ला विराजमान होण्याचा तो क्षण सारेजण डोळ्यात साठवून घेण्यासाठी उत्सुक आहेत. या सोहळ्यासाठी 4000 संत आणि मान्यवर उपस्थित असणार आहेत. वाराणसीचे पंडित लक्ष्मिकांत दीक्षित या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची पूजा करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही प्राणप्रतिष्ठा पूजा संपन्न होणार आहे त्यानंतर भाविकांसाठी श्रीरामांचे हे मंदिर खुले होणार आहे. नक्की वाचा: Ayodhya Ram Mandir Consecration Ceremony: प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यातील मुख्य पुजार्‍यांचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाशी कनेक्शन; पहा कोण आहेत मुख्य पुजारी दीक्षित? 

भाविकांना देखील आयुष्यात एकदाच पहायला मिळणारा हा अनुभव डोळ्यात साठवून घ्यायचा आहे. त्यासाठी भाविकांची रीघ अयोद्धेला लागली आहे. श्रीरामांच्या दर्शनासाठी तुम्ही देखील अयोद्धेमध्ये दाखल होणार असाल तर जाणून घ्या दर्शन आणि आरतीच्या वेळा काय आहेत?

अयोद्धा श्रीराम मंदिर दर्शन वेळ

प्राणप्रतिष्ठा पूजेनंतर श्रीरामांच्या जन्मभूमीचं हे मंदिर भाविकांसाठी खुले होईल. सकाळी 7 ते 11.30 आणि दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत मंदिर खुले असेल. आठवड्याचे सारे दिवस मंदिर खुले असणार आहे.

अयोद्धा श्रीराम मंदिर आरती वेळ

अयोद्धेच्या श्रीराम मंदिरामध्ये दिवसातून दोनदा आरती होणार आहे. सकाळी (जागरण/ शृंगार आरती) 6.30 वाजता होणार, भोग आरती दुपारी 12 वाजता होणार तर संध्या आरती 7.30 वाजता होणार आहे. विशेष बाब म्हणजे या आरतीचे पास भाविकांना ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरूपात दिले जाणार आहेत.

आरती दिवसातून तीन वेळा आयोजित केली जाणार आहे. फक्त पासधारकच त्यात उपस्थित राहू शकतात. आरतीसाठी पास सरकारने जारी केलेले ओळखपत्र तयार करून मिळू शकतात. सध्या फक्त 30 लोकांना पास घेऊन आरतीला उपस्थित राहण्याची परवानगी आहे. भाविकांच्या संख्येनुसार ही संख्या वाढवता येईल. ही सेवा विनामूल्य आहे.

ऑनलाईन आरती पास साठी online.srjbtkshetra.org/#/aarti या लिंक वर तुम्हांला ज्या दिवशी, ज्या वेळी आरती करायची आहे त्याची निवड करून पास मिळवू शकता. सध्या या पासचं वाटप सुरू करण्यात आलं आहे.  Ayodhya Ram Mandir Inauguration: अयोद्धा राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला Sachin Tendulkar ते Mukesh Ambani 7000 खास पाहुण्यांना आमंत्रण! 

'आरती' पास मिळविण्यासाठी, भक्तांना वैध सरकारी ओळख पुराव्यासह 'आरती' सुरू होण्यापूर्वी किमान अर्धा तास आधी मंदिर कॅम्प ऑफिसमध्ये पोहोचावे लागेल.