Airtel Data Breach 2024: Bharti Airtel ने फेटाळले 'Data Breach' चे दावे; 'हा केवळ नाव खराब करण्याचा प्रयत्न' - कंपनीची माहिती

हा केवळ कंपनीच्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे.

Airtel (PC - Twitter/ANI)

सुनील मित्तल यांच्या Bharti Airtel ने सुरक्षा यंत्रणा मध्ये छेडछाड झाल्याच्या वृत्ताला फेटाळलं आहे. अशाप्रकारचे आरोप केवळ टेलिकॉम कंपनीच्या प्रतिमेला डाग लावण्याचा प्रयत्न आहे. सध्या काही रिपोर्ट मध्ये एअरटेल ग्राहकांच्या डाटा सोबत छेडछाड झाल्याचं म्हटलं आहे. मात्र यामधून कंपनीचं नाव खराब करणं हा केवळ हेतू असल्याचं दिसत आहे. आम्ही सार्‍या गोष्टी तपासून पाहिल्या आहेत. अशाप्रकारे कोणतीही छेडछाड झाली नसल्याची माहिती Bharti Airtel च्या प्रवक्त्यांनी म्हटलं आहे. त्यांनी याबाबातचं एक परिपत्रक देखील जारी केलं आहे.

Airtel च्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, हॅकर्स कडे कोणतीही माहिती मिळवल्याचा पुरावा ते देऊ शकलेले नाहीत. हा केवळ कंपनीच्या नावाची बदनामी करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं आहे. Bharti Airtel International Roaming Packs: एअरटेलने लॉन्च केला परदेशात प्रवास करणाऱ्या ग्राहकांसाठी परवडणारा आंतरराष्ट्रीय रोमिंग प्लॅन; व्हॉईस कॉलिंगसह मिळणार इन-फ्लाइट कनेक्टिव्हिटी .

एअरटेल इंडियाची माहिती

कोणतीही खात्री न केलेल्या रिपोर्ट मध्ये असं सांगण्यात आले होते की, 375 मिलियन एअरटेल सब्सस्क्रायबर्सचे फोन नंबर, इमेल, आधार नंबर हे डार्क वेब वर विकायला उपलब्ध आहेत. धमकी देणार्‍याने स्वतःची ओळख 'xenZen'सांगितली आहे तर डार्क वेब वर ही माहिती 50 हजार डॉलर्स मध्ये ठेवल्याचंही सांगितलं आहे.

डार्क वेब हा एक इंटरनेटचा असा एक भाग आहे ज्यामध्ये लोकांना त्यांची ओळख, लोकेशन लपावता येऊ शकते. चोरीला गेलेला वैयक्तिक डेटा जादा रकमेत विकण्यासाठी डार्क वेबचा गैरवापर केला जाऊ शकतो.