आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी Aadhaar Card ची गरज नाही; फक्त या '3' गोष्टी महत्त्वाच्या

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केलेल्या नव्या उमेदवारांना आता व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी आधार कार्डची गरज भासणार नाही.

Aadhaar-Driving Licence (Photo Credits: File Photo)

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केलेल्या नव्या उमेदवारांना आता व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी आधार कार्डची गरज भासणार नाही. सरकारने आता नियमात बदल करत ड्रायव्हिंग लायसन्सच्या व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी आधार कार्डची गरज नसल्याचे सांगितले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तर देताना सरकारने ड्रायव्हिंग लायसन्सच्या व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी आधार कार्डची गरज नसल्याचे म्हटले आहे.

याबद्दल अधिक माहिती देताना नितीन गडकरी म्हणाले की, व्हेहिकल रजिस्ट्रेशनमधून मिळालेले आधार नंबर 1.65 कोटी इतके आहेत. आरटीओत होणारी बायमेट्रीक कलेक्शनची प्रोसेस आता थांबवण्यात आली आहे. (1 ऑक्टोबर पासून ड्रायव्हिंग लायसन्स,आरसीबूक नव्या रूपात; मायक्रोचीप क्यूआर कोड मुळे वाहतूक नियम मोडणार्‍यांना बसणार चाप)

त्यामुळे आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधार कार्डची गरज भासणार नाही. तर ही कागदपत्रे आवश्यक ठरतील:

# अड्रेस फ्रुप (पासपोर्ट, रेशन कार्ड, वोटर आयडी)

# आयडेन्टीटी फ्रुप (पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर आयडी, जन्म दाखला किंवा 10 वीचे मार्कशीट)

# पासपोर्ट साईज फोटो

यापूर्वी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधार कार्ड असणे अनिर्वाय होते. बनावट ड्रायव्हिंग लायसन्सला आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif