Blinkit: अब्बब!! दक्षिण दिल्लीतील ग्राहकाने ब्लिंकिटवरून मागवले 9,940 कंडोम; 'ब्लिंकिट ट्रेंड्स 2023' च्या अहवालात खुलासा
ब्लिंकिट ट्रेंड्स 2023 नुसार, 2023 मध्ये गुरुग्राममध्ये 65,973 लाइटरची ऑर्डर देण्यात आली होती. तर शहराने यावर्षी सॉफ्ट ड्रिंक्सपेक्षा जास्त टॉनिक वॉटर (कार्बोनेटेड पेये) ऑर्डर केले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यावर्षी सुमारे 30,02,080 PartySmart टॅब्लेट (मद्यपान केल्यानंतर सकाळी हँगओव्हर टाळण्यासाठी) ऑर्डर करण्यात आल्या.
Blinkit Trends 2023: डिसेंबर महिना संपण्यास काही तासांचा काळावधी बाकी आहे. दरम्यान, ब्लिंकिटचे संस्थापक (Founder of Blinkit) अल्बिंदर धिंडसा (Albinder Dhindsa) यांनी 2023 सालातील काही मनोरंजक विक्री ट्रेंड उघड केले आहेत. त्यांच्या मते कंडोम (Condom) आणि पार्टी स्मार्ट टॅब्लेट (Party Smart Tablet) च्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. याबाबतची आकडेवारी त्यांनी शेअर केली आहे. या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील एका ग्राहकाने 2023 मध्ये झोमॅटोच्या मालकीच्या क्विक डिलिव्हरी प्लॅटफॉर्म ब्लिंकिट (Blinkit) वरून 9940 कंडोम मागवले आहेत.
ब्लिंकिट ट्रेंड्स 2023 नुसार, 2023 मध्ये गुरुग्राममध्ये 65,973 लाइटरची ऑर्डर देण्यात आली होती. तर शहराने यावर्षी सॉफ्ट ड्रिंक्सपेक्षा जास्त टॉनिक वॉटर (कार्बोनेटेड पेये) ऑर्डर केले. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यावर्षी सुमारे 30,02,080 PartySmart टॅब्लेट (मद्यपान केल्यानंतर सकाळी हँगओव्हर टाळण्यासाठी) ऑर्डर करण्यात आल्या. याशिवाय बेंगळुरूमधील एका व्यक्तीने 1,59,900 रुपये किमतीचा iPhone 15 Pro Max, Lays आणि सहा केळीची ऑर्डर दिली. (हेही वाचा - New Year 2023: भारतातील कोणत्या राज्यातील लोक नववर्षाला सर्वाधिक दारू पितात? तुम्हालाही हा प्रश्न पडलाय का? चला तर मग उत्तर जाणून घेऊयात)
मध्यरात्रीनंतर मॅगीच्या 3,20,04,725 पाकिटांची ऑर्डर -
मध्यरात्रीनंतर सुमारे 3,20,04,725 मॅगीच्या पाकिटांची ऑर्डर देण्यात आली. एका ग्राहकाने एका ऑर्डरमध्ये 101 लिटर मिनरल वॉटर खरेदी केले. यावर्षी ब्लिंकिटच्या माध्यमातून सुमारे 80,267 गंगाजल बाटल्यांचे वाटप करण्यात आले. याशिवाय, 2023 मध्ये एका ग्राहकाने 4,832 बाथ साबण विकत घेतले. (हेही वाचा - Cancer Risk due to Alcohol: दारूच्या पहिल्या थेंबापासून सुरु होतो 'कर्करोगा'चा धोका; थोडेसे मद्यपानही शरीरासाठी घातक, WHO चा इशारा)
तथापी, यावर्षी सुमारे 351,033 प्रिंटआउट्स सकाळी 8 वाजेपूर्वी वितरित केले गेले. तसेच 1,22,38,740 आईस्क्रीम आणि 8,50,011 आइस क्यूब पॅकेटसह 45,16,490 एनो पाऊच ऑर्डर केले गेले. तसेच एका ग्राहकाने एका महिन्यात 38 अंडरवेअर ऑर्डर केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका ग्राहकाने 972 मोबाईल चार्जर मागवले.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)