7th Pay Commission News Today: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच डीए आणि डीआरमध्ये वाढ, पण कधी? घ्या जाणून

सातव्या वेतन (7th Pay Commission 2022) आयोगाअंतर्गत महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते.

7th Pay Commission | (Photo Credit - Twitter)

सातव्या वेतन (7th Pay Commission 2022) आयोगाअंतर्गत महागाई भत्ता (DA) आणि महागाई सवलत (DR) वाढीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना लवकरच आनंदाची बातमी मिळू शकते. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र सरकार लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार डीए आणि डीआर वाढीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, केंद्र सरकारच्या सेवेत असलेल्या कर्मचार्‍यांच्या डीए आणि डीआरमध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते. पहिल्यांदा जानेवारीत आणि दुसऱ्यांदा जुलैमध्ये. तथापी, सरकारी कर्मचार्‍यांच्या माहितीसाठी असे की केंद्राने 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशी अंतर्गत DA आणि DR वाढीबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

महागाई भत्ता (DA) सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो, तर निवृत्ती वेतनधारकांना महागाई सवलत (DR) दिली जाते. केंद्र 7 व्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर DA आणि DR वाढ करते आणि सामान्यतः ते मागील सहा महिन्यांच्या AICPI निर्देशांकावर अवलंबून असते. (हेही वाचा, 7th Pay Commission: केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये होणार 4 टक्के वाढ? सप्टेंबरमध्ये घोषणा होण्याची शक्यता)

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केंद्र डीए 4% वाढवण्याची शक्यता आहे. सध्या, केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 34% डीए मिळत आहे जो मार्च 2022 मध्ये 3%नी वाढवण्यात आला होता. या आधी 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार सरकारी कर्मचाऱ्यांना 31% डीए मिळत होता. अहवालांवर विश्वास ठेवला तर, जुलैसाठी डीए आणि डीआर वाढ 28 सप्टेंबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे म्हणजे, सरकारने अलीकडेच नवीनतम AICPI निर्देशांक डेटा जारी केल्यामुळे DA आणि DR मधील वाढ लवकर झाली पाहिजे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे. 7 व्या वेतन आयोगाने AICPI निर्देशांक डेटाच्या आधारे DA आणि DR वाढीची शिफारस केली आहे. औद्योगिक कामगारांसाठी किरकोळ महागाईचा निर्देशांक जुलै 2022 मध्ये 0.7 अंकांनी वाढला आणि तो 129.9 अंकांवर राहिला. जून 2022 मध्ये AICPI निर्देशांक डेटा 129.2 अंक होता.