7th Pay Commission: खुशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढीची शक्यता, लवकरच होणार घोषणा
केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाने (7th Pay Commission) केलेल्या शिफारसींनुसार ही वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातही मोठी वाढ होणार आहे.
केंद्र सेवेत (Central Employee) असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर (Good News) आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या महागाई भत्त्यात लवकरच वाढ होण्याची शक्यता आहे. सातव्या वेतन आयोगाने (7th Pay Commission) केलेल्या शिफारसींनुसार ही वाढ झाली तर कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनातही मोठी वाढ होणार आहे. या वेळी त्यांना मिळणारा महागाई भत्ता हा 6% वाढू शकतो. ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात गलेलठ्ठ वाढ पाहायला मिळू शकते. AICPI च्या अहावालानुसार ताजी आकडेवारी पुढे आली आहे. त्यानुसार स्पष्ट झाले आहे की, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात चांगलीच वाढ होणार आहे.
प्रसारमाध्यमांनी AICPI च्या हवाल्याने दिलेल्या आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात सातत्याने वाढ पाहायला मिळते आहे. एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात हे आकडे 1.3 पॉईंटचे वाढ दर्शवतात. एका रिपोर्टनुसार 3 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे. या बैठकीत महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) केली जाण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यानंतर AICPI इंडेक्सचे आकडे सातत्याने वाढत आहेत. मे महिन्यात AICPI इंडेक्सच्या अंकांमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. या वेळी 1.3 पॉइंटची तेजी पाहायला मिळत आहे आणि त्यात वाढ होऊन ती 129 पॉईंटवर गेली आहे. यासोबतच हेही निश्चित झाले आहे की, कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात आता जवळपास 6% वाढ झाली आहे. आता जून महिन्यात हा आकडा वाढला नाही तर 6% वाढ निश्चित मानली जाऊ शकते. (हेही वाचा, 7th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; जुलैमध्ये 6 टक्क्यांनी वाढू शकतो DA; पगारात होणार मोठी वाढ)
दरम्यान, इंडेक्सने जानेवारीमध्ये 125.1 पॉइंट, फेब्रुवारी महिन्यात 125.0, मार्च महिन्यात 126.0 आणि एप्रिल महिन्यात 127.7 पॉईंट इतका होता. जर डिए मध्ये 6 टक्के वाढ झाली असती तर कर्मचाऱ्यांना आणखी फायदा मिळाला असता. सध्यास्थितीत कर्मचाऱ्यांना 34% मळतो. 6 टक्के वाढ होऊन तो 40 टक्के होऊ शकतो. असे घडल्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 41 हजारांहून अधिक वाढ पाहायला मिळू शकते.
सांगितले जात आहे की, सरकार 3 ऑगस्टपर्यंत महागाई भत्त्यात वाढ करण्याची शक्यता आहे. नव्या वाढीसह केंद्रीय कर्मचारी वेतनात 12,960 रुपयांपासून ते 40,968 रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. AICPI Index 2022 ची आकडेवारी पाहून हा तर्क लावण्यात येत आहे.