7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच मिळू शकते अजून एक गुडन्यूज; पगारवाढीची शक्यता
डीएचे नवे दर 1 जुलै पासून लागू करण्यात आले आहेत.
7TH CPC Update: 7 व्या वेतन आयोगा (7th Pay Commission) अंतर्गत पगार मिळणाऱ्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना (Central Government Employees) आता मूळ वेतनात 28 टक्के महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळत आहे. डीएचे नवे दर 1 जुलै पासून लागू करण्यात आले आहेत. मागील वर्षाप्रमाणे यंदाही डीए (DA) चे दर वाढवण्यात आले आहे. दरम्यान, डीएच्या दरात आणखी वाढ होऊ शकते, असा दावा अनेक अहवालांमधून करण्यात आला आहे. परंतु, अद्याप याची अधिकृतरित्या पृष्टी झालेली नाही.
एका रिपोर्टनुसार, केंद्र सरकार सप्टेंबरच्या मध्यापर्यंत डीए मध्ये 3 टक्के वाढ करण्याची घोषणा करु शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना सप्टेंबरच्या वेतनासह 31 टक्के दराने डीए मिळेल. मात्र सरकारकडून अद्याप डीए वाढीबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत डीएमध्ये वाढ करण्याच्या रिपोर्ट सरकारने नाकारलाही नाही किंवा त्याची पृष्टीही केली नाही. (7th Pay Commission: पुणे महानगरपालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करा, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी)
दरम्यान, दसरा किंवा दिवाळी म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये डीएचे दर 3 टक्क्यांनी वाढण्याची घोषणा होऊ शकते, अशीही माहिती समोर येत आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या (All India Consumer Price Index) डेटाचा हवाला देत डीएनए ने दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, डीए दरात 3 टक्के वाढ होण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्याच अहवालानुसार, AICPI ने मे 2021 साठी निर्देशांकात 0.5 अंकांनी वाढ केल्यानंतर 120.6 ची पातळी गाठली.
आतापर्यंत जून 2021 चा एआयसीपीआय जारी झालेला नाही. जर एआयसीपीआय 130 अंकावर पोहचल्यास डीएमध्ये 4 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. परंतु, एआयसीपीआयमध्ये 10 अंकांनी वाढ होणे शक्य नाही. त्यामुळे डीएमध्ये 3 टक्क्यांनीच वाढ होईल, असे बोलले जात आहे.