1 सप्टेंबर पासून बँकिंग, वाहतुक आणि टॅक्स संबंधित नियमात बदल होणार
त्यामुळे बदललेल्या नियमांचा थेट प्रभाव व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे.
येत्या 1 सप्टेंबर पासून बँकिंग, ट्रॅफिक आणि टॅक्स संबंधित काही नियमात बदल होणार आहेत. त्यामुळे बदललेल्या नियमांचा थेट प्रभाव व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर होणार आहे. तत्पूर्वी कोणत्या संदर्भात नियमात बदल करण्यात येणार आहेत हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
महिन्याची सुरुवात करण्यासाठी फक्त नवीन बदल कोणते झाले इतकच माहित करुन घेण्यापेक्षा ते नेमके काय आणि कसे अंमलात आणायचे हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. माहित करुन घ्या काय आहेत हे नवीन बदल:
>>बँकिंग संबंधित नियमात बदल-
1 सप्टेंबर पासून बँक संबंधित काही नियमात बदल होणार आहेत. तर देशातील सर्वात मोठी स्टेट बँक ऑफ इंडिया त्यांच्या ग्राहकांना होम किंवा ऑटो लोन घेण्यासाठी रेपो रेट सोबत लिंक करण्यात येणार आहे. त्यामुळे हा रेपो रेट लागू झाल्यानंतर आरबीआय त्यांच्या रेपो रेट मध्ये कपात करण्याची शक्यता तेव्हाच आहे जेव्हा याचा तत्काळ फायदा मिळणार आहे.
तसेच बँक सुरु होण्याची आणि बंद होण्याची वेळ सुद्धा बदलली जाणार आहे. शासकीय बँकेमधून 1 तासाच्या आतमध्ये होम, ऑटो आणि पर्सनल लोन घेण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार आहे.
>>वाहतुकीच्या नियमात बदल-
1 सप्टेंबर पासून वाहतुकीच्या नियमात बदल होणार आहेत. या दिवसापासून वाहतुकीसंबंधित कोणतेही नियम मोडल्यास दंडाची रक्कम मोठ्या प्रमाणात वसूल करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दारु पिऊन गाडी चालवणे, वेगाने गाडी चालवणे किंवा ओव्हरलोडिंग सामानसह अन्य काही गोष्टींबाबत दंडासाठी वसूल करण्यात येणाऱ्या रक्केत वाढ करण्यात येणार आहे.
>>विमा नियमांत बदल-
जर तुमच्याकडे दुचाकी असल्यास 1 सप्टेंबर पासून त्या संबंधित विम्याच्या नियमात बदल होणार आहेत. या बदलत्या नियमांनुसार विमा कंपनी आता वाहनाचे नुकसान, नैसर्गिक आपत्ती, वाहनाची तोडफोड संबंधित एक वेगळ्या विम्याची सुविधा सुरु करणार आहे.
>>टॅक्स नियमात बदल-
येत्या 1 सप्टेंबर पासून टॅक्स संबंइद काही नियम बदलणार आहेत. त्यामध्ये यापूर्वीच्या टॅक्सची रक्कम भरण्यासाठी एक नवी स्किम सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे थकीत टॅक्सची रक्कम सुद्धा भरता येणार आहे.(ATM News: एटीएम व्यवहारांवर येणार मर्यादा, सहा ते 12 तासात काढता येणार एकदाच पैसे)
त्यामुळे नागरिकांनी येत्या 1 सप्टेंबर पासून विविध क्षेत्रात होणाऱ्या बदलांबद्दल अधिच जाणून घ्या. तसेच बदललेल्या नियमांमुळे याचा फायदा सुद्धा नागरिकांना होणार आहे.