Madya Pradesh News: धार्मिक स्थळी पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याप्रकरणी 6 जणांना केली अटक, युट्यूबवर बघून बनवला स्फोटक पदार्थ

धार्मिक स्थळावर पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याप्रकरणी गुन्हे शाखा आणि मल्हारगंज पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी एका मुलीसह सहा जणांना अटक केली.

Crime, FIR | Archived, Edited, Symbolic Images)

Madya Pradesh News: मध्य प्रदेशातील इंदूर (Indor) येथील मल्हारगंज परिसरात एका धार्मिक स्थळावर पेट्रोलच्या बाटल्या फेकल्याप्रकरणी गुन्हे शाखा (Crime Branch) आणि मल्हारगंज पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी एका मुलीसह सहा जणांना अटक केली. डीसीपी आदित्य मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्टच्या रात्री मल्हारगंज भागातील एका धार्मिक स्थळावर काही तरुण सीसीटीव्हीमध्ये पेट्रोलच्या बाटल्या फेकताना दिसले होते. सीसीटीव्हीमध्ये तरुणांसोबत एक तरुणीही दिसली होती. धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोपींची ओळख पटवण्यासाठी परिसरात लावलेले सीसीटीव्ही तपासण्यात आले. याप्रकरणी मल्हारगंज पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यातील एक बाटली रस्त्यावर पडल्याचे तर दुसरी धार्मिक स्थळाच्या भिंतीवर आदळल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला आणि संपुर्ण घटनेची माहिती घेतली. क्राईम ब्रान्च कडे या संदर्भात व्हिडिओ आहे.

सीसीटीव्ही आणि माहिती देणाऱ्यांच्या मदतीने जितू खेतकर आणि नयन जाधव या दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले. त्यांनी आपला गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी मुलीसह इतर आरोपींना अटक केली. आरोपींची अधिक चौकशी करण्यात येत आहे. या तरुणांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पेट्रोल बॉम्ब बनवण्याचा व्हिडिओ पाहिल्याचे सांगण्यात येत आहे.धार्मिक स्थळाशी संबंधित लोकांनी पोलिस आयुक्त मकरंद देवसकर यांची भेट घेऊन आरोपींना अटक करण्याची मागणी केली. सीपींनी त्यांना आश्वासन दिले की एक टीम तयार करण्यात आली असून आरोपींना लवकरच अटक केली जाईल आणि सायंकाळपर्यंत सहाही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले.