Indore Accident: इंदौर येथे ट्रकची स्कूल बसला धडक, तीन विद्यार्थी जखमी
मध्य प्रदेशातील इंदौर येथील चंदन नगर पोलिस स्टेशन परिसरात एका ट्रकने स्कूल बसला धडक दिल्याने एका खाजगी शाळेतील तीन विद्यार्थी जखमी झाले आहे.
Indore Accident: मध्य प्रदेशातील इंदौर येथील चंदन नगर पोलिस स्टेशन परिसरात एका ट्रकने स्कूल बसला धडक दिल्याने एका खाजगी शाळेतील तीन विद्यार्थी जखमी झाले आहे. शाळेजवळ जाण्यासाठी बसने यू टर्न घेतल्यानंतर ट्रकने बसला पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली. ही घटना शाळेजवळील धार रोडवर घडली. पोलिस घटनास्थळी पोहोचून ट्रक आणि स्कूल बस दोन्ही ताब्यात घेतले. (हेही वाचा- दहिसर-बोरीवली स्टेशन ब्रीज मागे नाल्यात पडून 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकने स्कूल बसला धडक दिल्याने तीन विद्यार्थी जखमी झाले. या अपघातात बसच्या मागील बाजूचे नुकसान झाले असून,बसच्या काच्या फुटल्या आहेत. परिसरात बराचं वेळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. इयत्ता नववीतील अक्षत सुलखिया, इयत्ता पाचवीतील आनंद पटेल, मोहित पवार अशी जखमी मुलांची नावे आहे. अपघात झाला तेव्हा बसमध्ये 24 विद्यार्थी होते. जखमी विद्यार्थ्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
ट्रक चालकाने आरोप केला की, बस चालक बस वेगवाग चालवत होता आणि त्याने अचानक यू टर्न घेतला ज्यामुळे अपघात झाला. मात्र, ट्रकचालकाचा निष्काळजीपणा हा अपघाताचे कारण असल्याचा आरोप बसचालक शाहरुखने केला आहे. पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध भादंविच्या कलमांखाली गुन्हा दाखल करून चालकाला ताब्यात घेतले. अपघातानंतर रस्त्यात बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती.