Cushionless Seats In IndiGo Flight: इंडिगोच्या बेंगळुरू-भोपाळ फ्लाइटमध्ये कुशन नसलेल्या सीट पाहून प्रवासी हैराण; ट्विटरवर फोटो शेअर केल्यानंतर एअरलाइनने दिली 'अशी' प्रतिक्रिया
शाह यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर या घटनेबद्दल उपहासात्मक टिप्पणीसह ट्विट केले. त्यांनी कुशनलेस सीटचा फोटोही शेअर केला आहे.
Cushionless Seats In IndiGo Flight: सोशल मीडियावर अनेकवेळा अशी छायाचित्रे समोर येतात, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित होतात. असाच एक धक्कादायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे प्रकरण इंडिगो फ्लाइट (IndiGo Flight) शी संबंधित आहे. एका इंडिगो प्रवाशाने कुशन नसलेले सीट (Cushionless Seats) पाहिले. त्यानंतर या प्रवाशाने आपल्या X हँडलवर या सीटचा फोटो शेअर केला आहे. त्यानंतर विमान कंपनीने या प्रवाशाच्या ट्विटवर प्रतिक्रिया दिली आहे.
इंडिगोने बेंगळुरू ते भोपाळ असा प्रवास करणाऱ्या यवनिका राज शाह यांना दोन सीटवर कुशन गायब झाल्याचे पाहून आश्चर्य वाटले. शाह यांनी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर या घटनेबद्दल उपहासात्मक टिप्पणीसह ट्विट केले. त्यांनी कुशनलेस सीटचा फोटोही शेअर केला आहे. ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर विमान कंपनीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. (हेही वाचा - IndiGo Airlines च्या Jaipur-Bengaluru विमानामध्ये दारूच्या नशेत असलेल्या प्रवाशाचे क्रु सोबत गैरवर्तन)
ही पोस्ट बुधवारी X वर शेअर करण्यात आली होती. पोस्ट केल्यापासून त्याला सात लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. पोस्टवर सुमारे 8,000 लाईक्स आणि अनेक कमेंट्स आल्या आहेत. तथापी, इंडिगोनेही आपल्या उत्तरात लिहिले, 'मॅडम, आमच्याशी बोलल्याबद्दल धन्यवाद. साफसफाईच्या उद्देशाने उड्डाण करण्यापूर्वी सीट कुशन बदलण्यात आले. आमच्या केबिन क्रूने ताबडतोब ज्या ग्राहकांना या जागा दिल्या होत्या त्यांना कळवले. साफसफाईची ही एक मानक सराव आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना स्वच्छतेची सर्वोच्च मानके प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.' (Seat Cushion Missing on IndiGo Flight: काय सांगता? बेंगळुरू ते भोपाळ इंडिगो फ्लाइटमध्ये चक्क सीट कुशन गायब; महिलेने शेअर केला फोटो)
दरम्यान, इतर अनेकजण यूजर्सनी या पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. एका व्यक्तीने लिहिले आहे की, गेल्या आठवड्यात मुंबई ते इंदूरला जाणाऱ्या इंडिगोच्या फ्लाइटमध्ये अशीच सीट पाहिली होती. प्रत्यक्ष प्रवासी आल्यानंतरच त्यांनी पॅडिंग समायोजित केले. कदाचित त्यांना कुशनचा तुटवडा जाणवत असेल आणि मागणीनुसार ते वापरत असतील! तसेच दुसऱ्या एका यूजरने लिहिलं आहे की, ॲक्युप्रेशर सुविधेसह अशी उपचारात्मक सीट बुक करण्यासाठी किती पैसे द्यावे लागतील. गेल्या काही वर्षांत इंडिगोच्या सेवांमध्ये खरोखरच घट झाली आहे, अशी देखील प्रतिक्रिया एका यूजरने दिली आहे.