Coronavirus Tests In India: गेल्या 24 तासात 10 लाख कोरोना चाचण्या

केवळ मागील 2 आठवड्यात 1,22,66,514 चाचण्या करण्यात आल्या. देशात तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय मागील गेल्या 24 तासांत देशात 10 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

Coronavirus (Photo Credits: PTI)

Coronavirus Tests In India: भारतातील एकूण कोरोना चाचण्यांनी आज 3.4 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. केवळ मागील 2 आठवड्यात 1,22,66,514 चाचण्या करण्यात आल्या. देशात तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात आल्या. याशिवाय मागील गेल्या 24 तासांत देशात 10 लाखांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

भारतात गेल्या 24 तासात 65,081 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ड देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात 28,39,882 रुग्णांची कोरोना विरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे. त्यामुळे त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77% टक्के इतके आहे. (हेही वाचा - Coronavirus Cases in India: भारतात मागील 24 तासांत आढळले 69,921 रुग्ण, कोरोना बाधितांची एकूण संख्या 36,91,167 वर)

दरम्यान, मागील 24 तासांत 69,921 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 819 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 36,91,167 लाखांवर पोहोचली आहे. तसेच आतापर्यंत 65,288 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या 7,85,996 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.