Coronavirus Cases In India: भारतात कोरोनाग्रस्तांनी पार केला 53 लाखांचा आकडा; गेल्या 24 तासात 93,337 नवे कोरोनाग्रस्त, तर 1,247 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात 93,337 नवे कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 1,247 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 53,08,015 इतका झाला आहे. सध्या भारतात 10,13,964 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
Coronavirus Cases In India: भारतात कोरोनाग्रस्तांनी 53 लाखांचा आकडा पार केला आहे. गेल्या 24 तासात 93,337 नवे कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 1,247 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 53,08,015 इतका झाला आहे. सध्या भारतात 10,13,964 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
याशिवाय आतापर्यंत 42,08,432 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. दुर्देवाची बाब म्हणजे आतापर्यंत देशात 85,619 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे. (हेही वाचा - COVID-19 Vaccine Update: कोविड19 वरील लसची चाचणी दुसऱ्या टप्प्यात, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत मिळण्याची शक्यता- एम्स कम्युनिटी मेडिसिन डिपार्टमेंट प्रमुख डॉ. संजय राय)
दरम्यान, भारतात 18 सप्टेंबरपर्यंत 6,24,54,254 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. तसेच शुक्रवारी देशात 8,81,911 चाचण्या घेण्यात आल्या. यासंदर्भात ICMR ने माहिती दिली आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी, कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. शुक्रवारी देशात 87,472 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं. गेल्या 11 दिवसांपासून भारतात सातत्याने रोज 70,000 पेक्षा जास्त रुग्ण बरे होत आहेत.