IPL Auction 2025 Live

रेल्वेच्या इ-तिकिटांवरील शुल्कात वाढ केल्यानंतर आता राजधानी एक्सप्रेसमधील खाणं महागणार

त्यानंतर आता राजधानी एक्सप्रेससह शताब्दी आणि दुरांतो मधील खाणं महागणार आहे.

Indian Railway (Photo Credit: Twitter)

रेल्वेच्या इ-तिकिटांवरील शुल्कात रेल्वेने वाढ करण्याचा निर्णय रेल्वेप्रशासनाने घेतला आहे. त्यानंतर आता राजधानी एक्सप्रेससह शताब्दी आणि दुरांतो मधील खाणं महागणार आहे. सध्या या एक्सप्रेसमधील खाण्याची किंमत 110 रुपये असून त्यावरील पैसे 40 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. या वाढीव किंमीच्या दरासाठी मंजूरी मिळाल्यानंतर नव्या किंमतीनुसार खाण्याचे दर त्याप्रमाणे आकारले जाणार आहेत. यापूर्वी प्रवाशांकडून रेल्वेत देण्यात येणाऱ्या खाण्याबद्दल तक्रारी केल्या होत्या.

सीएजी 2017 च्या रिपोर्टनुसार, रेल्वेत देण्यात येणारे खाणे उत्तम नसल्याची बाब समोर आली आहे. यावर रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी असे म्हटले आहे की, गेल्या सहा वर्षांपासून रेल्वेतील खाद्यपदार्थांचा किंमतीत वाढ करण्यात आलेली नाही. यासाठी उत्तम दर्जाचे खाणे मिळण्यासाठी किंमत वाढवणे आवश्यक आहे.(ऑनलाईन तिकिटांच्या शुल्कात वाढ होणार, रेल्वे प्रशासनाचा निर्णय)

रेल्वेत आठवड्यातील 5 दिवसांसाठी विविध मेन्यू ठरवण्यात आले आहेत. हेच मेन्यू अलटूनपालटून प्रवाशांना दिले जातात. नाश्तापासून ते जेवणापर्यंतची सोय रेल्वेत केली जाते. मात्र प्रवाशी बहुतांश वेळा रेल्वेतील खाण खाण्यापूर्वी विचार करतात.