IPL Auction 2025 Live

Rafael: भारताला उर्वरित चारपैकी तीन राफेल फेब्रुवारीमध्ये मिळणार, वायु प्रमुख राम चौधरी यांची महिती

देशाने यापूर्वीच करार केला आहे. त्यापैकी 32 विमाने आधीच प्राप्त झाली आहेत, तर उर्वरित चार राफेल विमाने मिळणार आहेत, त्यापैकी तीन राफेल विमाने पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये देशाला मिळणार आहेत.

वायु सेना प्रमुख व‍िवेक राम चौधरी (Photo Credit - Twitter)

भारतीय वायु दलाला (Indian Air Force) उर्वरित चारपैकी तीन राफेल (Rafael) पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये  मिळतील. भारताला डसॉल्ट राफेल लढाऊ विमाने वेळेवर दिल्याबद्दल फ्रान्सचे (France) आभार मानताना भारतीय वायु दलाचे (IAF) प्रमुख विवेक राम चौधरी (Ram Chaudhari) यांनी शनिवारी ही माहिती दिली. दोन इंजिन असलेले मल्टीरोल लढाऊ विमान राफेल वेळेवर दिल्याबद्दल आम्ही फ्रान्सचे आभारी आहोत, असे हवाई प्रमुख विवेक राम चौधरी यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले. देशाने फ्रान्सला 36 राफेल विमानांसाठी सहमती दर्शवली आहे. देशाने यापूर्वीच करार केला आहे. त्यापैकी 32 विमाने आधीच प्राप्त झाली आहेत, तर उर्वरित चार राफेल विमाने मिळणार आहेत, त्यापैकी तीन राफेल विमाने पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये देशाला मिळणार आहेत.

चाचणी पूर्ण झाल्यानंतर देशाला शेवटचे राफेल मिळेल

उर्वरित चारपैकी तीन राफेल देशाला मिळण्याची अंतिम मुदत स्पष्ट करण्यात आली असली तरी अंतिम राफेलसाठी वायु दलाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. शेवटच्या राफेल विमानाच्या वितरणाबाबत, वायु दल प्रमुख म्हणाले की, शेवटचे विमान, ज्यात भारत-विशिष्ट सुधारणा असतील, सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर देशाला प्राप्त होईल. ते म्हणाले की, भविष्यात राफेलची देखभाल आणि भारतात डी-लेव्हल मेंटेनन्स सुविधा उभारण्याच्या मुद्द्यांवरही आम्ही संरक्षणमंत्र्यांशी चर्चा केली आहे.

मात्र, याच्या एक दिवस आधी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी सांगितले होते की, विनंती केल्यास फ्रान्स भारताला अतिरिक्त राफेल लढाऊ विमाने देण्यास तयार आहे. त्यांचे भारतीय समकक्ष राजनाथ सिंह यांच्याशी तिसऱ्या वार्षिक संरक्षण चर्चेपूर्वी ते म्हणाले की आम्हाला माहित आहे की विमानाची गरज आहे, लवकरच विमानवाहू जहाज दिले जाईल. (हे ही वाचा Jammu-Kashmir Update: कुलगाममध्ये सुरक्षा दलांकडून बंदी ठेवलेल्या दोन मुलींची सुटका, 2 दहशतवाद्यांना कंठस्नान.)

लडाखमध्ये हवाई दलाची तैनाती सुरूच राहणार 

एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांनी देखील भारत-चीन सीमेवरील तणावावर भाष्य करताना सांगितले की, लडाखमधील काही भागातून सैन्याने माघार घ्यायला सुरुवात केली आहे, जरी पूर्णपणे माघार घेतली गेली नाही. त्याचबरोबर लडाखमध्ये वायु दल तैनात असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, देशातील कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी आम्ही तयार आहोत.