Rahul Gandhi On PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत आधुनिक काळातील चक्रव्यूहात अडकला; संसदेत राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा
आजही 6 लोक भारताला नियंत्रित करत आहेत. हे सहा जण म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी. दरम्यान, राहुल यांच्या विधानावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप केला तेव्हा ते म्हणाले, 'तुम्हाला हवे असल्यास मी NSA, अंबानी आणि अदानी यांची नावे काढून टाकेन आणि फक्त 3 नावे घेईन.'
Rahul Gandhi On PM Modi: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोमवारी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. देश आज एका 'चक्रव्यूह'मध्ये अडकला आहे, ज्याचे प्रतिनिधित्व कमळ (भाजप) करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) या कमळाला छातीवर धारण करतात. या कमळ चिन्हाने दर्शविलेल्या चक्रव्यूहात भारत अडकला आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. भारतात भीतीचे वातावरण असल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, 'हजारो वर्षांपूर्वी कुरुक्षेत्रात अभिमन्यूला 'चक्रव्यूह'मध्ये अडकवून 6 जणांनी मारले होते. मी थोडे संशोधन केले आणि कळले की 'चक्रव्यूह'चे दुसरे नाव पद्मव्यूह - म्हणजे 'कमल निर्माण'. 'चक्रव्यूह' हा कमळाच्या फुलाचा आकार आहे. 21व्या शतकात एक नवे 'चक्रव्यूह' निर्माण झाले आहे, तेही कमळाच्या फुलाच्या रूपात. पंतप्रधान हे चिन्ह छातीवर धारण करतात. जे अभिमन्यूचे केले गेले ते भारतासाठी केले जात आहे. तेच तरुण, शेतकरी, महिला, लहान आणि मध्यम उद्योगांसाठी केले जात आहे.
राहुल गांधी म्हणाले की, आजही 'चक्रव्यूह'च्या केंद्रस्थानी 6 लोक आहेत. आजही 6 लोक भारताला नियंत्रित करत आहेत. हे सहा जण म्हणजे नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अंबानी आणि अदानी. दरम्यान, राहुल यांच्या विधानावर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हस्तक्षेप केला तेव्हा ते म्हणाले, 'तुम्हाला हवे असल्यास मी NSA, अंबानी आणि अदानी यांची नावे काढून टाकेन आणि फक्त 3 नावे घेईन.' (हेही वाचा - Rahul Gandhi On Union Budget 2024: मोदी सरकारचा अर्थसंकल्प 'खूर्ची बचाव'; राहुल गांधी यांची प्रतिक्रिया)
आम्ही हे चक्र मोडू - राहुल गांधी
तुम्ही तयार केलेल्या चक्रव्यूहामुळे करोडो लोकांचे नुकसान होत आहे. हा 'चक्रव्यूह' आम्ही मोडणार आहोत. हे करण्याचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे तुम्हाला ज्याची भीती वाटते ती म्हणजे जात जनगणना. आम्ही या सभागृहात जात जनगणना पास करू आणि तुम्हाला दाखवू. (हेही वाचा -Rahul Gandhi On Delhi Coaching Incident: कोचिंग सेंटर दुर्घटनेवर राहुल गांधींची प्रतिक्रिया; संस्थांच्या बेशिस्तपणावरुन चालक आणि सरकारवर टीका)
भाषणादरम्यान राहुल गांधी यांनी अर्थ मंत्रालयात अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी आयोजित पारंपरिक हलवा समारंभाचे पोस्टर दाखवले. त्यांनी सांगितले की, 'या फोटोत बजेट पुडिंग वाटले जात आहे. त्यात मला एकही ओबीसी, आदिवासी, दलित अधिकारी दिसत नाही. 20 अधिकाऱ्यांनी भारताचा अर्थसंकल्प तयार केला. हिंदुस्थानचा हलवा वाटण्याचे काम 20 जणांनी केले आहे. (Revised Tax Slabs in New Tax Regime: बजेट 2024 मध्ये नव्या कर रचनेमध्ये बदल जाहीर; 3 लाखपर्यंतचं उत्पन्न करमुक्त )
पहा व्हिडिओ -
राहुल गांधी पुढे म्हणाले, 'तुम्ही लोक हलवा खात आहात आणि देशातील 73 टक्के लोकांना हलवा मिळत नाही. भारताचे बजेट 20 लोकांनी तयार केले आणि त्यांनी हलवा खाल्ला. जात जनगणनेचा मुद्दा अर्थसंकल्पात मांडावा अशी माझी इच्छा होती. 95 टक्के लोकांना जातीची जनगणना हवी आहे. आपली हिस्सेदारी काय आहे हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. सरकार हलव्याचे वाटप करते आणि 50-60 टक्के लोकांना हलवा मिळतो.
राहुल गांधी यांचा अदानी-अंबानींवर हल्ला -
अदानी-अंबानी यांचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले की, या दोघांकडे बंदरे आणि रेल्वे आहे. सर्व पैशांवर त्यांची मक्तेदारी आहे. मला त्यांच्याबद्दल कसे बोलावे ते माहित नाही. पण मला बोलायचे आहे. यावर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, राहुल गांधींना सभागृहाचे नियम माहीत नाहीत. देश हा नियम आणि संविधानाने चालतो. यावर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. तथापी, पेपरफुटीबाबतही राहुल यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. राहुल गांधी म्हणाले, मुख्य मुद्दा तरुणांचा आहे. परीक्षेचा पेपर फुटतो. सरकारने मध्यमवर्गीयांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. भांडवली नफा करातील वाढ ही छातीत वार करणारी ठरली आहे.