Porn Website Data Leak: पॉर्न पाहणाऱ्यांच्या अडचणीत वाढ; 'या' लोकप्रिय वेबसाईटचा डेटा झाला लीक
ही 27 व्या क्रमांकाची सर्वात लोकप्रिय साइट आहे.
Porn Website Data Leak: प्रसिद्ध पॉर्न वेबसाइटचा डेटा लीक (Data Leak) झाला आहे, ज्यात नाव आणि ईमेल आयडी सारख्या वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती आहे. हा डेटा वापरकर्त्यांचा ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा सायबर हल्ला करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. सायबरन्यूजच्या अहवालानुसार, MyFreeCams नावाच्या पोर्न वेबसाइटवरील डेटा लीक झाला आहे. लीक केलेल्या डेटामध्ये सुमारे 2 दशलक्ष वापरकर्त्यांची माहिती आहे. वापरकर्त्यांचा ईमेल पत्ता, वापरकर्ता नाव आणि पासवर्ड हा सर्व डेटा काळ्या बाजारात विकला जात आहे.
अहवालानुसार, हॅकर्सच्या प्रसिद्ध फोरमवर युजरचा डेटाबेस विकला जात आहे. येथे, 10 हजार वापरकर्त्यांच्या डेटाच्या बदल्यात बिटकॉइनच्या रूपात 1500 डॉलर मागितले जात आहे. असा दावा केला जात आहे की, 10 हजार वापरकर्त्यांचा डेटा खरेदी करणारे त्यातून किमान 10 हजार डॉलर्स कमवू शकतात. ही बातमी समजल्यानंतर पोर्न वेबसाइटनेही याची खातरजमा केली आणि सांगितले की, त्यांनी वापरकर्त्यांना माहिती देऊन पासवर्ड रीसेट केला आहे. (वाचा - धक्कादायक! 5.62 लाख भारतीय फेसबुक वापरकर्त्यांचा वैयक्तिक डेटा चोरी; CBI कडून Cambridge Analytica आणि Global Science Research Limited विरोधात गुन्हा दाखल)
मायफ्री कॅम्स एक लोकप्रिय अश्लील वेबसाइट आहे, ज्यात सुमारे 70 दशलक्ष मासिक व्हिजिटर्स आहेत. ही 27 व्या क्रमांकाची सर्वात लोकप्रिय साइट आहे. आपण देखील मायफ्रीकॅम्सचे वापरकर्ते असाल तर, आपल्या यूजरआयडीचा पासवर्ड शक्य तितक्या लवकर बदला. अन्यथा तुम्ही सायबर हल्ल्याचे बळी ठरू शकता.
वापरकर्त्यांचे चोरी केलेल्या तपशीलाचा वापर हॅकर्स अनेक मार्गाने करू शकतात. ते आपल्या Myfricams टोकनवरील शिल्लक वापरू शकतात. याशिवाय, वापरकर्त्यांना ब्लॅकमेलिंग ईमेल देखील मिळू शकतात, ज्यामध्ये वापरकर्त्यांना त्यांच्या पॉर्नबद्दलची माहिती कुटुंब आणि मित्रांना दिली जाईल, अशी धमकी दिली जाऊ शकते.