Tamil Nadu Shocker: तामिळनाडूत पतीने केला पत्नीच्या प्रियकराचा शिरच्छेद, आरोपीला अटक

वेलुसामी याला पोलिसांनी अटक केली आहे. मुरुगन असे मृताचे नाव असून, तो शेतकरी होता. मुरुगन तेनकासी जिल्ह्यातील कन्नडीकुलम येथे आरोपीच्या घराजवळ राहत होता.

प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: PTI)

Tamil Nadu Shocker: तामिळनाडूमधून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. तामिळनाडूच्या तेनकासी जिल्ह्यातील (Tenkasi District) एका व्यक्तीने आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून तिच्या प्रियकराचा शिरच्छेद केला. नंतर तुतीकोरीन जिल्ह्यातील आपल्या पत्नीच्या निवासस्थानी जाऊन त्याने कापलेले डोके तिच्या घरासमोर ठेवले. ही भीषण घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

आरोपी एस. वेलुसामी याला पोलिसांनी अटक केली आहे. मुरुगन असे मृताचे नाव असून, तो शेतकरी होता. मुरुगन तेनकासी जिल्ह्यातील कन्नडीकुलम येथे आरोपीच्या घराजवळ राहत होता. पोलिसांनी सांगितले की, वेलुसामीचे लग्न तुतीकोरीन जिल्ह्यातील राजापुथुकुडी येथील इसक्कीअम्मलशी झाले आहे. इसक्कीअम्मलचे जवळच राहणाऱ्या मुरुगनशी प्रेमसंबंध होते. (हेही वाचा - HC on Husband-Wife's Sexual Relations: पती-पत्नीच्या सेक्समध्ये 'अनैसर्गिक' काहीही नाही, लैंगिक संबंध फक्त संततीपुरते मर्यादित नाहीत- उच्च न्यायालय)

नंतर इसाकीममल वेलुसामीपासून विभक्त झाली आणि तिच्या आईवडिलांसोबत राजापुथुकुडी येथे राहायला गेली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेलुसामीला हे पाहून संताप अनावर झाला आणि त्याने रागाच्या भरात मुरुगनची हत्या केली.

त्यानंतर तो मुरुगनचे कापलेले डोके घेऊन इसक्कीअम्मलच्या घरी गेला. त्याने मुरुगनचे शीर तिच्या घरासमोर ठेवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.