धक्कादायक! बिहारमध्ये 'चेटकीण' समजून महिलेची गोळ्या घालून हत्या; चार जणांवर गुन्हा दाखल
राज्यातील सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज पोलिस स्टेशन परिसरातील औरलहा पंचायतीच्या कर्नपट्टी प्रभाग क्रमांक 14 मध्ये चेटकीण (Witch) समजून एका महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी ही महिला झोपली होती. गावातील लोकांनी चेटकीण समजून तिच्यावर गोळ्या घातल्या. मृत महिलेच्या पतीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, शेजारच्या 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिहारमध्ये (Bihar) गुरुवारी रात्री अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. राज्यातील सुपौल जिल्ह्यातील त्रिवेणीगंज पोलिस स्टेशन परिसरातील औरलहा पंचायतीच्या कर्नपट्टी प्रभाग क्रमांक 14 मध्ये चेटकीण (Witch) समजून एका महिलेची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. घटनेच्या वेळी ही महिला झोपली होती. गावातील लोकांनी चेटकीण समजून तिच्यावर गोळ्या घातल्या. मृत महिलेच्या पतीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, शेजारच्या 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, कर्णपट्टी येथे राहणारी जागेश्वर मेहता यांची पत्नी रेणू देवी (वय 46) रात्री अंगणात झोपली होती. यावेळी तिच्यासोबत तिचे तीन मुलही अंगणात झोपले होते. दरम्यान, रात्री बाराच्या सुमारास रेणूची सासू तारा देवी जाग्या झाल्या. तारा देवी अंगणात आली तेव्हा तिला रेणूच्या डोक्यात रक्तस्त्राव दिसला.
मृत महिलेच्या पती आणि मुलांनी सांगितले की, आवाज ऐकून त्यांची झोप उडाली. यावेळी चार व्यक्ती त्यांना दारातून पळताना दिसल्या. त्यांनी या लोकांचा पाठलाग केला. परंतु, यातील कोणीही हाती लागले नाही. त्यानंतर रेणूला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रस्त्यातचं तिचा मृत्यू झाला होता. (हेही वाचा - Bihar Assembly Election 2020: बिहार येथे कशा होतील निवडणूका आणि किती असेल गर्दी? आयोगने दिले 'हे' उत्तर)
मृताचे पती जागेश्वर मेहता यांनी सांगितले की, शेजारच्या काही लोकांनी त्यांच्या पत्नीवर चेटकीण असल्याचा आरोप करत होते. प्रमुख संदीप कुमार सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी मृत महिलेच्या शेजारी राहणाऱ्या रामदेव यादव, श्यामदेव यादव, मनोज यादव आणि संजय यादव यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सुपौल जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, बिहार मधील विधानसभा निवडणूकांच्या तारखा निवडणूक आयोगाकडून घोषित करण्यात आल्या असून येत्या 28 ऑक्टोबर, 3 नोव्हेंबर आणि 7 नोव्हेंबरला अशा तीन टप्प्यांमध्ये मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. विधानसभेच्या 243 जागांसाठी या निवडणूका होणार आहेत. या निवडणूकांचे निकाल 10 नोव्हेंबरला जाहीर केले जाणार आहेत.