Jammu-Kashmir Update: अवंतीपोरामध्ये सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांना कंठस्नान, नागबेरनमधील त्रालच्या जंगलात झाली चकमक
दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे.
जम्मू -काश्मीरच्या (Jammu and Kashmir) अवंतीपोरामध्ये (Avantipora) सुरक्षा दलांनी (Security forces) तीन दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला आहे. दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. सुरक्षा दलांना दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच, परिसराला ताबडतोब वेढा घातला गेला. घेराव केल्यानंतर सैनिकांनी दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन केले. मात्र दहशतवाद्यांनी गोळीबार (Firing) सुरू केला. घटनास्थळी उपस्थित सुरक्षा दलांनी लगेच मोर्चा नेला आणि दहशतवाद्यांकडून सुरू असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली. चकमकीत ठार झालेले तीन दहशतवादी जैशचे कमांडर (Commander of Jaish) असल्याचे सांगितले जाते. मात्र,अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. घटनेनंतर परिसरातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अवंतीपोराच्या नागबेरन त्रालच्या जंगलाच्या वरच्या भागात चकमक सुरू होती. या चकमकीत पोलीस आणि लष्कराचे जवान मिळून ऑपरेशन करत होते. शुक्रवारी देखील सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. यापूर्वी शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांनी दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील एका शिक्षण विभागाच्या कर्मचाऱ्याच्या घरात घुसून त्याला ठार मारले होते. ही घटना त्राल भागातील आहे. 35 वर्षीय जावेद अहमद यांच्या लुरगाम येथे रात्री साडेनऊच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळी झाडली आणि ते पळून गेले.