Assam Murder Case: आसाममध्ये 6 वर्षाच्या मुलीने अश्लिल क्लिप पाहण्यास नकार दिल्याने अल्पवयीन मुलांनी केली हत्या, तीन आरोपी अटकेत

तीन आरोपींनी अल्पवयीन मुलीची हत्या केली कारण तिने त्यांच्यासोबत अश्लील क्लिप (Pornographic clips) पाहण्यास नकार दिला.

Murder | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

आसामच्या (Assam) नायगाव जिल्ह्यात (Naigaon district) तीन अल्पवयीन मुलांनी एका सहा वर्षांच्या मुलीची निर्दयीपणे हत्या (murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन आरोपींनी अल्पवयीन मुलीची हत्या केली कारण तिने त्यांच्यासोबत अश्लील क्लिप (Pornographic clips) पाहण्यास नकार दिला.  आरोपींचे वय आठ ते अकरा वर्षांच्या दरम्यान आहे. ही घटना मंगळवारी बळीबटजवळील दगड-क्रशिंग मिलमध्ये घडली आहे. सर्व तीन आरोपींना अटक करण्यात आली. गुन्हा लपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीच्या वडिलांनाही पोलिसांनी अटक केली आहे. वृत्तानुसार, मुलीचा मृतदेह मंगळवारी दगड-क्रशिंग मिलच्या शौचालयात सापडला होता.

मृताच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. प्राथमिक तपासा दरम्यान, पोलिसांना आठ ते अकरा वर्षे वयोगटातील तीन आरोपींनी मुलीची हत्या केल्याचे आढळले.  आमच्या तपासा दरम्यान आम्हाला आढळले की त्याच गावातील 8 ते 11 वर्षांच्या तीन अल्पवयीन मुलांनी 6 वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपीच्या पित्यानेही संपूर्ण घटना लपविण्यासाठी प्रयत्न केला होता. असे पोलीस आनंद मिश्रा नागांव जिल्हा अधीक्षक म्हणाले. 

अहवालानुसार, आरोपी व्यसनी होते. तसेच त्यांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी आरोपीचा मोबाईल जप्त केला आहे.  आरोपींनी मुलीची दगडाने हत्या केली. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली. तीन अल्पवयीन मुली अल्पवयीन मुलीच्या घराजवळ राहत होत्या. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा ऐकावे ते नवलच! 33 वर्षीय व्यक्तीला गेले 6 महिने पोटदुखीचा त्रास; डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पोटातून बाहेर काढला मोबाईल फोन

आम्ही जुन्या शाळेत तपास केला आहे, त्या तपासात काहीही आढळले नाही. आम्ही या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक व्यक्तीची चौकशी केली आणि त्यांची विधाने जोडली जात नाहीत असे वाटले आणि तेव्हाच आम्हाला समजले की ते खोटे बोलत आहेत आणि त्यांना काय घडले हे माहित आहे, त्यानंतर वडिलांनी कबूल केले की आपल्या मुलाने गुन्हा केला आहे, कालिबोर पोलीस स्टेशनचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) मृण्मयी दास यांनी सांगितले .