सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करताय ? मग या '५' गोष्टी अवश्य लक्षात ठेवा !

अन्यथा मेहनत वाया जाते.

परीक्षा (Photo Credit: PTI)

भारतात सरकारी नोकरी करणाऱ्यांची प्रतिमा काहीशी खास आहे. त्यामुळे प्रत्येकालाच सरकारी नोकरी मिळावी असे वाटत असते आणि यासाठी अनेकजण प्रयत्न करतानाही दिसतात. पण मेहनतीला योग्य दिशा असायला हवी. अन्यथा मेहनत वाया जाते. येत्या काळात भरमसाठ सरकारी नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. अशावेळी प्रयत्न करताना काही प्रमुख गोष्टींकडे विशेष लक्ष दिल्यास यश हमखास मिळू शकेल. त्यासाठी या काही विशेष टिप्स...

सोशल मीडियापासून दूर राहा

परीक्षा जवळ आल्यानंतर जितके सोशल मीडियापासून दूर राहाल तितके उत्तम. त्यामुळे अधिकाधिक वेळ तुम्ही अभ्यासासाठी देऊ शकाल. त्याचबरोबर अभ्यासापासून मन विचलित होणार नाही. कारण एकदा Facebook, Whatsapp, Instagram यांसारख्या सोशल साईट्स ओपन केल्यावर वेळ कसा भूरकन उडून जातो, कळत देखील नाही.

अभ्यासाकडे अधिक लक्ष द्या

परीक्षा जवळ आल्यानंतर शक्य तितका वेळ अभ्यासासाठी द्या. अभ्यासाच्या टॉपिक्सचे नियोजन करा आणि त्यानुसार अभ्यास करा. कोणत्याही विषयात काही अडत असल्यास, कंफ्यूजन असल्यास त्वरीत क्लिअर करा.

ताण घेऊ नका

परीक्षा जवळ आल्यानंतर अधिकतर मुले ताण घेतात किंवा घाबरुन जातात. परंतु, यामुळे केलेला अभ्यासही विसरण्याची आणि गोंधळ उडण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशावेळी धीराने परिस्थिती हाताळा. शांत राहा आणि ताण न घेता अभ्यास करा.

मॉक टेस्टने अभ्यास करा

परीक्षेत कोणतीही चूक होऊ नये म्हणून नियमित अभ्यास करत राहा. मॉक टेस्ट देताना वेळेत प्रश्नप्रत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा.

या टिप्स जरुर लक्षात ठेवा

परीक्षेचा पेपर १०० गुणांचा असून त्यासाठी ९० मिनिटांचा अवधी दिलेला असतो. यापैकी गणितासाठी २५ गुण, जनरल इंटिलीजेंस अँड रिजनिंगसाठी ३० गुण, जनरल सायन्ससाठी २५ गुण तर जनरल अव्हेरनेस अँड करंड अफेअर्ससाठी २० गुण असतात. यापैकी सर्वात आधी जनरल अव्हेरनेस अँड करंड अफेअर्सचे प्रश्न सोडवून घ्या. कारण यात गोंधळ उडण्याची शक्यता कमी असते. त्यानंतर जनरल सायन्स आणि गणिताचे प्रश्न क्रमशः सोडवा. शेवटी जनरल इंटिलीजेंस अँड रिजनिंगच्या प्रश्नांकडे वळा. कारण यासाठी अधिक वेळ लागतो आणि गोंधळण्याची शक्यताही अधिक असते. या ट्रिकने पेपर सोडवल्यास लवकरात लवकर प्रश्न सोडवू शकाल.

या सोप्या टिप्स आणि ट्रिक्सने परीक्षेला सामोरे गेल्यास पेपर सोडवण्यास वेळेची कमतरता भासणार नाही.



संबंधित बातम्या

Xiaomi Black Friday Sale 2020 अंतर्गत स्मार्टफोन आणि अॅक्सेसरीज वर 10,000 रुपयांपर्यंत डिस्काऊंट; Amazon India वरुन करु शकता खरेदी

Hole In Delhi-Mumbai Highway: देशातील सर्वात मोठ्या दिल्ली मुंबई द्रुतगती मार्गावर पडला मोठा खड्डा; कर्मचाऱ्याने ठरवले उंदरांना जबाबदार, कंपनीकडून निलंबित (Watch Video)

AP Liquor Policy: स्वस्त दारु योजना; आवडता ब्रँड फक्त 99 रुपयांत; नवे धोरण 1 ऑक्टोबरपासून लागू; तळीरामांनो घ्या जाणून

Dismissal of Dr. Ajit Ranade from Vice-Chancellor Post: डॉ. अजित रानडे नियुक्ती रद्द करण्याच्या निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयात; 23 सप्टेंबर पर्यंत निर्णयाची अंमलबजाणी न करण्याचे आदेश

IPS Officer Shivdeep Lande Resigns: आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा राजीनामा; तडकाफडकी निर्णयाचे कारण गुलदस्त्यात