दर 3 वर्षांनी आधारकार्ड अपडेट करत नसाल तर, होऊ शकते मोठे नुकसान!
एक देश, एक नागरिकत्व या संकल्पनेसाठी आधारकार्ड वितरित करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, दर तीन वर्षांनी आधारकार्ड अपडेट करणे गरजे आहे.
आधारकार्ड (Aadhaar Card) हे अतिशय महत्वाचे कागदपत्रे म्हणून ओळखले जाते. एक देश, एक नागरिकत्व या संकल्पनेसाठी आधारकार्ड वितरित करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, दर तीन वर्षांनी आधारकार्ड अपडेट करणे गरजे आहे. मात्र, आपले आधारकार्ड अपडेट नसल्याने काही नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय आपल्या आधारकार्डवर चुकीची माहिती असल्यामुळे अनेकांची कामे अडकून पडतात. बॅंकेत किंवा शासकीय पातळीवर सर्व कामांत आधारकार्डची सर्वप्रथम मागणी केली जाते. यामुळे नागकरिकांनी आपले आधारकार्ड दर तीन वर्षांनी नियमितपणे अपडेट करणे गरजेचे आहे.
आज संपूर्ण देशभरात आधारकार्ड हे महत्वाचे कागदपत्रे म्हणून ग्राह्य धरले जात आहे. कोणत्याही सरकारी कामात आधारकार्डची मागणी केली जाते. यामुळे आपल्या आधारकार्डवरील विसंगत माहितीमुळे नागरिकांना आधारकार्ड पुन्हा अपडेट करणे महत्वाचे ठरते. आधारकार्डवर असलेला चुकीचा पत्ता, स्पेलिंगमधील चुका, जन्मतारीख नोंद नसणे, फोटो, ठराविक वर्षानंतर बोटांचे ठसे न जुळने, यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांनी आपले आधारकार्ड नियमितपणे अपडेट करावे, असे आवाहन सरकारकडून केले जाते. हे देखील वाचा- Aadhaar-PAN Linking: SMS आणि Login शिवाय अशा पद्धतीने करा आधार-पॅन कार्डला लिंक
आधारकार्ड अपडेट करणे म्हणजे आपल्या आधारकार्डवरील क्रमांकदेखील बदलला जाईल असा गैरसमज काही नागरिकांमध्ये आहे. आधारकार्ड अपडेट म्हणजे नव्याने आधारकार्ड तयार करणे नव्हे. एकदा आधारकार्ड क्रमांक मिळाला तर तोच अखेरपर्यंत असतो. त्यात बदल करता येत नाही. एखाद्या मुलीची लग्न झाले तरीदेखील तिच्या आधारकार्डवरील आधार क्रमांक बदलता येत नाही.