Rajasthan: 'दहा दिवसांत मंदिर सोडले नाही तर तुझा गळा कापू', भरतपूरच्या पुजाऱ्याला धमकी, म्हणाले, कन्हैयालाल सारखा हाल करु

त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार एबीव्हीपीकडून या घटनेच्या निषेधार्थ कॉलेजच्या गेटला टाळे ठोकून निदर्शने केली आहेत.

Murder | Image only representative purpose (Photo Credits: Pxhere)

राजस्थानमध्ये (Rajasthan) हिंदू समाजातील लोकांना धमक्या मिळण्याचे प्रकार थांबत नाहीत. भरतपूर (Bharatpur) जिल्ह्यातून ताजं प्रकरण समोर आलं आहे. येथील एमएसजे कॉलेजमध्ये बनवण्यात आलेल्या मंदिराच्या पुजाऱ्याला दहा दिवसांत मंदिर सोडले नाही तर तुझा गळा चिरु अशी धमकी देण्यात आली आहे. जर वेळीच ऐकला नाहीत, तर तुझा हाल कन्हैय्यालाल सारखा करु, असा इशाराही पुजाऱ्याला देण्यात आला आहे. पुजाऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्याचबरोबर मिळालेल्या माहितीनुसार एबीव्हीपीकडून या घटनेच्या निषेधार्थ कॉलेजच्या गेटला टाळे ठोकून निदर्शने केली आहेत. माहितीनुसार, महाविद्यालयात बांधलेल्या मंदिराच्या भिंतीवर अज्ञात व्यक्तीने धमकीचे पत्र चिकटवले होते.

पोलिसांकडून तपास सुरु

सकाळी मंदिराचे पुजारी पूजा करण्यासाठी आले असता त्यांनी ते पत्र पाहिले. ज्यामध्ये 10 दिवसात मंदिर सोडण्याची धमकी देण्यात आली होती. तसे न केल्यास त्याचे परिणाम उदयपूरच्या कन्हैयालाल सारखे भोगावे लागतील, असे या पत्रात म्हटले आहे. याठिकाणी पुजाऱ्याच्या माहितीवरून पोलिसांनी मंदिराच्या भिंतीवर चिकटवलेला पत्र काढून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिस आजूबाजूला लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल. (हे देखील वाचा: Murder: गाणी ऐकण्यावरून पिता-पुत्रामध्ये वाद पोहोचला शिगेला, आवाज कमी करण्यास सांगितल्याने वडिलांची केली हत्या)

कन्हैया लालची करण्यात आली होती हत्या

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या टेलर कन्हैया लाल साहूची राजस्थानमधील उदयपूरमध्ये दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली होती. हल्लेखोरांनी गर्दीच्या बाजारपेठेत त्याच्या दुकानात घुसून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. या घटनेचे काही व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण आहे. जमावाने जाळपोळही सुरू केला होता. पोलिसांनी तातडीनं याप्रकरणी गंभीर पावलं उचलत दोघांना अटक ही केली होती.