Hyderabad Tragedy: नाल्यात 4 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी इमारतीचे अध्यक्ष आणि वॉचमॅनवर गुन्हा दाखल; घटना सीसीटीव्हीत कैद

या घटनेअंतर्गत पोलीसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यामुळे आणि पुरावे समोर आल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

hydrabad drowing case

Hyderabad Tragedy: हैद्राबाद मधील बाचुपल्ली भागातील प्रगती नगरमध्ये गेल्या काही दिवसांपुर्वी एका चार वर्षाचा मुलाचा मॅनहोलमध्ये वाहून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. या धक्कादायक घटनेची आणखी एक बाजू उलगडली आहे. या घटने अंतर्गत इमारतीतील अध्यक्ष आणि वॉचमॅनवर गुन्हा दाखल झाला आहे.  सीसीटीव्ही कॅमेरात या घटनेचा व्हिडिओ कैद झाला आहे. ज्याने घडलेल्या भीषण घटनांवर प्रकाश टाकला आहे.त्याचा  मृतदेह नंतर डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (DRF) च्या जवानांनी तुर्का चेरुवू कुकटपल्ली येथून बाहेर काढला.

ही हृदय पिळवटून टाकणारी घटना एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कैद केली आहेसुरुवातीला, पोलिसांनी घटनेची नोंद घेत फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) च्या कलम 174 नुसार गुन्हा दाखल केला आणि मिथुनचा मृतदेह त्याच्या कुटुंबाच्या ताब्यात दिला. मात्र, तपास सुरू असतानाच पाळत ठेवणाऱ्या कॅमेऱ्याच्या फुटेजमधून धक्कादायक खुलासे झाले. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात देखील मोठी खळबळ उडाली होती.

एनआरआय कॉलनी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष आणि एक वॉचमन मंगळवारी सकाळी 8:20 च्या सुमारास मॅनहोलचे कव्हर उघडताना दिसले, ही दुर्घटना घडण्याच्या काही क्षण आधी.

वाढत्या पुराव्यात भर घालत, सीसीटीव्ही फुटेजचा आणखी एक भाग सोशल मीडियावर समोर आला. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती साचलेले पाणी सोडण्यासाठी ड्रेनचे कव्हर काढताना दाखवण्यात आली आहे.एका घरमालकाच्या निष्काळजीपणाने लहान मुलाच्या धोक्यात गेला. पोलिसांनी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हृदयद्रावक घटनेनंतर, स्थानिक अधिकाऱ्यांनी सर्व रहिवाशांना एक चेतावणी जारी केली आहे, त्यांना मॅनहोलच्या कव्हरमध्ये छेडछाड न करण्याचे आवाहन केले आहे.