Hydrabad Shocker: चार वर्षांच्या मुलीला फाशी देत पालकांची आत्महत्या, भितींवर कारण लिहून घेतला टोकाचा निर्णय

एका दाम्पत्याने चार वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली आहे.

Hydrabad Shocker: चार वर्षांच्या मुलीला फाशी देत पालकांची आत्महत्या, भितींवर कारण लिहून घेतला टोकाचा निर्णय
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Hydrabad Shocker: हैद्राबाद येथे एका दाम्पत्याने चार वर्षाच्या मुलीची हत्या करून स्वत:ही गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्या (Suicide) करण्यापूर्वी दोघांनी घराच्या भिंतीवर आत्महत्येचा धक्कादायक खुलासा केला आहे. या प्रकरणी मुशीराबाद पोलिसांनी आत्महत्येची नोंद घेतली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.

माहितीनुसार, पती,पत्नी आणि मुलगी हे तिघे जण  मुशीराबाद गंगापुत्र कॉलनीत  भाड्याच्या खोलीत येथे राहत होते. साई कृष्णा (पती), पत्नी चित्रकला, आणि मुलगी तेजस्वी असं मृतांचे नाव आहे. शेजारच्यांनी शुक्रवारी दरवाजा ठोठावला, खुप वेळ कोणीही प्रतिसाद देत नसल्यामुळे पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडताच, तिघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडले, या घटनेनंतर परिसरात मोठी शांतता पसरली.

पोलिसांनी तिघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. आत्महत्या करण्यापूर्वी साई कृष्णाने घराच्या भिंतीवर हे टोकाचे पाऊल का उचलले आहे याचं कारण लिहले होते. साई  कृष्णाची पत्नी चित्रकला एका खासगी संस्थेत काम करत होती. मात्र, निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपाखाली त्यांना नोकरीतून काढून टाकण्यात आले. त्यांना चुकीच्या पध्दतीने कामावरून काढले जात असल्याने चित्रकला यांनी संस्थेतील वरिष्ठांना सांगितले. पंरुतु त्यांनरही त्यांना न्याय मिळाला नाही.

साई कृष्णा एका अॅप-आधारित सेवेत ड्रायव्हर म्हणून काम करत होता. या दाम्पत्याने गुरुवारी टोकाचे पाऊल उचलल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी गांधी रुग्णालयात हलवून तपास सुरू केला. साई कृष्णा आणि चित्रकला हे मुळचे आंध्रप्रदेशातील रहिवासी होते.

(The above story first appeared on LatestLY on Nov 18, 2023 02:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).