Ahmedabad Shocker: पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून पतीची आत्महत्या, मुलीच्या नोटबूकमध्ये मिळाली सुसाईड नोट

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती.

Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

गुजरातच्या (Gujarat) अहमदाबाद (Ahmedabad) येथील नाडियात (Nadiad) एका विवाहित व्यक्तीने 27 जून रोजी आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली होती. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली होती. परंतु, संबंधित व्यक्तीने आत्महत्यापूर्वी लिहल्याली सुसाईड नोट ( Suicide Note) सापडली आहे. तसेच पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला (Extramarital Affair) वैतागून या व्यक्तीने आत्महत्या केल्याची सुसाईड नोट मध्ये लिहले आहे. त्यानंतर मृताच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.

विमला दोडिया असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. विमला या वासना येथील रहिवाशी असून तिचा भाऊ कमलेश वाला याच्या मृत्यूच्या अडीच महिन्यानंतर तिने तिची वहिनी रेखा वालाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विमला यांनी पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत असे म्हटले आहे की, मृत कमलेशचे 15 वर्षांपूर्वी रेखाशी लग्न झाले होते. परंतु, कमलेश आणि रेखा यांचे जवळजवळ दोन वर्षांपासून चांगले संबंध नव्हते. त्यांच्यात किरकोळ कारणांवरून वाद होत असे. दरम्यान, रेखाचे मागील 5 वर्षांपासून एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते, याची माहिती कमलेशने विमला यांना दिली होती. हे देखील वाचा- Kerala Murder Case: कौटुंबिक वादाला कंटाळून पत्नीने चाकूने वार करत पतीची केली हत्या, पोलिसांनी आरोपीला घातल्या बेड्या

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेखा 24 जून रोजी कमलेश आणि त्याच्या 10 वर्षाच्या मुलीला सोडून निघून गेली होती. त्यानंतर कमलेशने 26 जून रोजी आपल्या मुलीला त्याच्या मोठ्या बहिणीच्या घरी सोडले. त्यानंतर 27 जून रोजी कमलेशची बहिण त्याला भेटायला आली. परंतु, घराचा दरवाजा बंद होता. बाहेरून अनेकदा आवाज देऊनही आतून प्रतिसाद न आल्याने घराचा दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी कमलेश घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

कमलेशच्या मृत्युच्या अडीच महिन्यानंतर त्याच्या मुलीच्या नोटबूकमध्ये त्याने लिहलेली सुसाईट नोट सापडली. ज्यात त्याने आपल्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला वैतागून आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे लिहले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.