Cyber Attacks in 2023: भारतात सायबर हल्ल्यांमध्ये मोठी वाढ; वेबसाइट्स आणि ॲप्सवर आतापर्यंत 5.14 अब्ज पेक्षा जास्त सायबर हल्ले

अहवालात आयटी सेवा, सल्ला, उत्पादन, दूरसंचार, विपणन आणि जाहिराती यांसारख्या उद्योगांवरील हल्ल्यांचे विश्लेषण केले आहे.

Representational Image (Photo Credit: PTI)

Cyber Attacks in 2023: सायबर हल्ल्यांसंदर्भात (Cyber Attacks) मोठी बातमी समोर आली आहे. इंडसफेस (IndusFace) अहवालानुसार, 2022 मध्ये भारतीय वेबसाइट्स आणि ॲप्सवर 5.14 अब्जहून अधिक सायबर हल्ले झाले. यामध्ये आरोग्य सेवा क्षेत्र सर्वाधिक प्रभावित झाले. याशिवाय, रिटेल आणि ई-कॉमर्स उद्योगांना कार्डिंग हल्ल्यांचा (Carding Attacks) सामना करावा लागला. हल्ल्यांमध्ये 10 पट वाढ झाल्याने सायबर हल्ले हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय बनत आहे.

किरकोळ आणि ई-कॉमर्स उद्योगांना प्रामुख्याने कार्डिंग हल्ल्यांसाठी लक्ष्य करण्यात आले. अहवालात आयटी सेवा, सल्ला, उत्पादन, दूरसंचार, विपणन आणि जाहिराती यांसारख्या उद्योगांवरील हल्ल्यांचे विश्लेषण केले आहे. IndusFace च्या 'Apptrana' नेटवर्कने जागतिक स्तरावर एकूण 6.8 अब्ज हल्ले रोखले. (हेही वाचा -ISRO Chief S. Somnath On Cyber Attacks: इस्रोवर दररोज 100 सायबर हल्ले होतात; इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांचा धक्कादायक खुलासा)

सायबर हल्ल्यात 63 टक्के त्रैमासिक वाढ -

2023 च्या पहिल्या तिमाहीपासून चौथ्या तिमाहीत सायबर हल्ल्यांमध्ये 63% त्रैमासिक वाढ झाल्यामुळे या अहवालात मजबूत सायबर सुरक्षा उपायांच्या गरजेवर भर देण्यात आला आहे. आरोग्य सेवा क्षेत्राला त्यांच्या वेबसाइटवर 100% बॉट हल्ल्यांचा सामना करावा लागला. तसेच बँकिंग, वित्त आणि विमा क्षेत्राने 90% संस्थांवर असेच हल्ले अनुभवले. (हेही वाचा - Cyber Attacks: Intelligence Collection च्या उद्देशाने 100 हाय प्रोफाइल लोकांवर सायबर हल्ला- Microsoft )

तथापी, 2023 मध्ये, 10 पैकी 8 साइट्स बॉट हल्ल्यांनी लक्ष्य केल्या होत्या. प्रत्येक तिमाहीत 46% वाढीसह, एकूण संख्या 467 दशलक्षांपेक्षा जास्त झाली. या अहवालात अमेरिका, यूके, रशिया, जर्मनी आणि सिंगापूर या प्रमुख देशावर झालेल्या सायबर हल्ल्यांचाही उल्लेख करण्यात आला आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif