Goa Hotel Manager Drowns Wife In Sea: गोव्यातील हॉटेल मॅनेजरने पत्नीला समुद्रात बुडवले; हत्येला अपघात दाखवण्याचा प्रयत्न, व्हिडिओमुळे उघडे पडले पितळ
पोलिसांना शुक्रवारी दुपारी दीक्षाचा मृतदेह समुद्रकिनाऱ्याजवळ आढळून आला. प्रथमदर्शनी, गौरवने त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिची हत्या केली. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते.
Goa Hotel Manager Drowns Wife In Sea: गोव्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विवाहबाह्य संबंधातून (Extramarital Affair) पतीने पत्नीचा समुद्रात बुडवून संपवलं. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. कोणालाही धक्का बसावा अशा अघोरी पद्धतीने आरोपीने पत्नीचा खून केला. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण गोव्यातील एका आलिशान हॉटेलचा व्यवस्थापक (Hotel Manager) गौरव कटियार (वय, 29) याला त्याची पत्नी दीक्षा गंगवार (वय, 27) हिला काबो-दे-रामा बीचवर बुडवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सांगितले की, कटियारने हत्येला अपघात म्हणून सादर करण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांना शुक्रवारी दुपारी दीक्षाचा मृतदेह समुद्रकिनाऱ्याजवळ आढळून आला. प्रथमदर्शनी, गौरवने त्याच्या पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे तिची हत्या केली. वर्षभरापूर्वी त्याचे लग्न झाले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शुक्रवारी दुपारी 3.45 च्या सुमारास ही घटना घडली. गौरव त्याच्या पत्नीला समुद्रकिनाऱ्यावर फिरायला घेऊन गेला होता. तेथे गौरवने पत्नी दिक्षा हिला एका खडकाळ भागात नेऊन समुद्रात बुडवले. महिलेच्या शरीरावर जखमा आढळल्या आहेत. (हेही वाचा -Gujarat Boat Accident: गुजरातमध्ये मोठी दुर्घटना; तलावात बोट उलटून 16 जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरु (Watch Video))
मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा केल्यानंतर गौरवने दु:ख झाल्याचा आव आणला आणि घटनेला अपघात म्हणण्याचा प्रयत्न केला. गौरवने पोलिसांचीही दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. पण एका स्थानिक व्यक्तीने शूट केलेल्या व्हिडिओ क्लिपने त्याचा पर्दाफाश केला. (हेही वाचा: Sudden Death in Madhya Pradesh: इंदूरमध्ये कोचिंग क्लासमध्ये शिकत असताना विद्यार्थ्याला आला हृदयविकाराचा झटका; जागीच मृत्यू)
पोलिसांनी सांगितले की, गौरव हा उत्तर प्रदेशातील लखनऊचा रहिवासी आहे. त्यांची पत्नी दीक्षाही लखनौची होती. सध्या पोलीस गौरवची चौकशी करत आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. त्याचवेळी दीक्षाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर तिचे कुटुंबीय शोकाकुल अवस्थेत आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)