Madhya Pradesh Road Accident: मध्य प्रदेशातील मुरैना येथे ट्रकचा भीषण अपघात, दोन भक्तांचा जागीच मृत्यू
ट्रकने ट्रॅक्टर - ट्रॉलीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन भक्तांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले.
Madhya Pradesh Road Accident: मध्य प्रदेशातील मुरैना येथे एक भीषण अपघात झाला आहे. ट्रकने ट्रॅक्टर - ट्रॉलीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात दोन भक्तांचा मृत्यू झाला. तर १४ जण जखमी झाले. हा अपघात जिल्हा मुख्यालयापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्ग ४४ वर पहाटे ५ वाजता हा अपघात घडला. या अपघातानंतर रस्त्यावर बराच वेळ गोंधळ निर्माण झाला. (हेही वाचा- वरळीत थरारक अपघात, BMW ची धडक, तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू)
मिळालेल्या माहितीनुसार, श्रावण सोमवार सुरु असताना शिवभक्त मंदिरा जात होते. मंदिरात रस्त्यावरून मिरवणूक जात असताना हा अपघात घडला. ट्रकने पाठी मागून ट्रॅक्टर- टॉलीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यात दोघांचा मृत्यू झाला. सिहोनिया भागातील रहिवासी भरत लाल शर्मा आणि रामनरेश शर्मा या दोघांचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी गर्दी केली.
जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, जखमींमध्ये दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातानंतर गावकऱ्यांनी ट्रकचालकाला मारहाण केली. चालकाला पकडून ठेवले आणि त्याला पोलिसांकडे सोपवले.
घटनास्थळी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली. त्यानंतर पोलिसांनी ट्रक चालकावर गुन्हा नोंदवला. अपघातानंतर गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले आहे. पोलिसांनी काही वेळानंतर हे आंदोलन रोखले आहे. अपघातानंतरचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.