Lucknow Shocker: एक वेळा नाही तर आठ वेळा कानाखाली मारली, विद्यार्थी जखमी, शिक्षक निलंबित

पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्याला महिला शिक्षकांने एवढे मारले की, त्याच्या कानातून रक्त येऊ लागली.

teacher Punish student PC TW

Lucknow Shocker: लखनऊ येथील एका खासगी शाळेत विद्यार्थ्याला शिक्षकाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्याला महिला शिक्षकांने एवढे मारले की, त्याच्या कानातून रक्त येऊ लागली. या गंभीर घटनेनंतर शिक्षकाला कामावरून निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हेही वाचा- अटकेपासून पळण्याचा प्रयत्न केला अन् पाय गमावला, तमिळनाडूमध्ये पोलिसांकडून चोराला पकडण्याचा सिनेस्टाईल प्रयत्न)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी शाळा सुटल्यानंतर घरी गेला मारहाण केल्यापासून त्यांच्या कानातून येऊ लागले होते. पीडित विद्यार्थ्याला त्याच्या वडिलांनी तात्काळ रुग्णालयात दाखळ केले. त्याच्यावर उपचार सुरु केले. या प्रकरणी मुलाच्या वडिलांनी शिक्षका विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पीडित मुलाने वडिलांना सांगितले की, शिक्षिकाने विचारलेल्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर दिले त्यामुळे महिला शिक्षकाने विद्यार्थ्याला कानाखाली लगावली. एकदा नाही तर आठ वेळा कानाखाली मारल्याचा आरोप विद्यार्थ्याने केला. विद्यार्थी घरी आल्यानंतर तो घबरला होता. ही घटना इतकी गंभीर आहे की, इतर पालकांनी यावर संताप व्यक्त केला. आरव चौरासिया असं पीडित विद्यार्थ्याचे नाव आहे.

शिक्षकाने एवढं मारहाण केल्याचे पाहून कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला. त्यानतंर मारहाण करणाऱ्या शिक्षकाविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शाळेच्या मुख्यध्यापकांनी या घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊ शिक्षकाला कामावरून निंलबित केले. पोलिसांनी या प्रकरणी शाळेतील वर्गातले सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif