House Collapse In Rajasthan: राजस्थानमधील जयपूर आणि दौसामध्ये मुसळधार पाऊस; करौलीमध्ये घर कोसळून पिता-पुत्राचा मृत्यू

रामकेश मीना यांनी सांगितले की, 'या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झाकीर खान आणि त्यांचा मुलगा रशीद खान अशी मृतांची नावे आहेत.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

House Collapse In Rajasthan: राजस्थान (Rajasthan) मध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. शनिवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. करौली जिल्ह्यात (Karauli District) मुसळधार पावसामुळे घर कोसळल्याने (House Collapse) रविवारी एक 40 वर्षीय व्यक्ती आणि त्याचा मुलगा ठार झाला. तसेच दोन जण जखमी झाले. करौली येथील डोलीखार मोहल्ला येथे कुटुंबीय घरात झोपलेले असताना ही दुर्दैवी घटना घडली.

या अपघाताबाबत बोलताना करौली जिल्हा रुग्णालयाचे प्रधान वैद्यकीय अधिकारी डॉ. रामकेश मीना यांनी सांगितले की, 'या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. झाकीर खान आणि त्यांचा मुलगा रशीद खान अशी मृतांची नावे आहेत. शवविच्छेदनानंतर दोघांचे मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.' (हेही वाचा -Varanasi House Collapse: मुसळधार पावसामुळे दोन घरे कोसळली, आठ लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु (Watch Video))

पूर्व राजस्थानमधील करौली, टोंक, सवाई माधोपूर, दौसा आणि पश्चिम राजस्थानमधील जैसलमेर, जोधपूर, फलोदी येथे सायंकाळी उशिरा मुसळधार पाऊस झाला. हवामान खात्याने रविवारी 8 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट आणि 14 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्यानुसार आठवडाभर पावसाची संततधार सुरू राहणार आहे. जयपूरमध्ये रविवारी सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या हंगामात आतापर्यंत राजस्थानमध्ये सरासरीपेक्षा 38 टक्के जास्त पाऊस झाला आहे. (हेही वाचा -Dharavi Building Collapse: धारावी परिसरात एका बांधकामाधीन इमारतीच्या भिंतीचा भाग कोसळून तीन जण जखमी)

राजस्थानमध्ये 1 जून ते 10 ऑगस्टपर्यंत सरासरी 273 मिमी पाऊस पडला आहे. तसेच या हंगामात आतापर्यंत 377 मिमी पाऊस झाला आहे. सिरोही, उदयपूर, झालावाड, प्रतापगड, डुंगरपूर आणि बांसवाडा जिल्हे वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे.