Delhi Rain: दिल्लीत पुढीत दोन ते तीन तासांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाने माहितीनुसार, दिल्ली आणि NCR भागात पुढील दोन तासांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे.

Rain

Delhi Rain: देशाची राजधानी दिल्लीत पहाटेपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. भारतीय हवामान विभागाने माहितीनुसार, दिल्ली आणि NCR भागात पुढील दोन तासांत आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीत काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाली आहे. (हेही वाचा- मुंबईसह कोकण -पश्चिम महाराष्ट्राला हाय अलर्ट; पुण्यात अतिवृष्टीचा इशारा)

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील नरेला, अलीपूर, बडिली, पितामपुरा, पंजाबी बाग, सीलमपूर, शहाद्रा, विवेक विहार, लाल किल्ला, राष्ट्रपती भवन, राजीव चौक, ITO, इंडिया गेट, लोदी रोड, आरके पुरम, डिफेन्स कॉलनी, हौज खा या ठिकाणी दोन तास पाऊस पडण्यासाठी शक्यता वर्तवली आहे. देशात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. (हेही वाचा-  हवामान विभागाने दिला अतिवृष्टीचा इशारा; नवी मुंबईतील शाळा उद्या राहणार बंद)

यासोबतच सीमापुरी, दिलशाद गार्डन, पटेल नगर आणि बुरारी सारख्या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड विजांचा गडगडाटसह पावसाची शक्यता आहे. जूनमध्ये सर्वांधित पावसाची नोंद झाली आहे. भारतीय  हवामान विभागानुसार, 27 जून रोजी सकाळी 8.30 ते रात्री 8.30 पर्यंत 228 मिमी पाऊस पडला. पावसामुळे वाहतुक सेवा विस्कळीत झाली आहे.