Sunanda Pushkar Death Case: शशी थरूर यांच्या अडचणी वाढणार; दिल्ली पोलिसांच्या याचिकेवर हायकोर्टाची नोटीस

पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाविरोधात दिल्ली पोलिसांच्या अपीलवर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना नोटीस बजावली आहे.

Shashi Tharoor (PC- Facebook)

Sunanda Pushkar Death Case: सुनंदा पुष्कर (Sunanda Pushkar) मृत्यू प्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरूर (Congress MP Shashi Tharoor) यांना दोषमुक्त करण्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली होती. पटियाला हाऊस कोर्टाने 18 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या निकालात शशी थरूर यांना मृत्यू प्रकरणातून दोषमुक्त केले. त्याचवेळी आता पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाविरोधात दिल्ली पोलिसांच्या अपीलवर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना नोटीस बजावली आहे.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांना मुक्त करण्याच्या ट्रायल कोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली आहे. सुमारे 15 महिन्यांच्या विलंबाने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. (हेही वाचा -Shashi Tharoor यांच्या सोशल मीडिया पोस्टवर भारतीय दूतावासाचा आक्षेप, जाणून घ्या काय आहे प्रकरण)

न्यायमूर्ती दिनेश कुमार शर्मा यांच्या खंडपीठाने याचिका दाखल करण्यातील विलंब माफ करण्याच्या पोलिसांच्या विनंतीवर नोटीस बजावल्यानंतर सुनावणी 7 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अर्ज दाखल करण्यास झालेल्या विलंबासाठी माफ करण्याची विनंती न्यायालयाला केली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये, कनिष्ठ न्यायालयाने थरूर यांना या प्रकरणात दोषमुक्त केले होते. (हेही वाचा - Shashi Tharoor यांनी Supriya Sule, Nusrat Jahan सह 6 महिला खासदारांसोबत फोटो पोस्ट करत म्हटलं 'कोण म्हणतं लोकसभा कामासाठी Attractive Place नाही ?)

शशी थरूर यांच्यावर गंभीर आरोप -

माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यावर दिल्ली पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 498A (पती किंवा त्याच्या नातेवाईकाकडून छळ) आणि कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोप सिद्ध झाल्यास 3 वर्षे आणि 10 वर्षे शिक्षा होऊ शकते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif