PM Modi US Visit: HAL ने GE Aerospace सोबत केला करार; आता भारतातचं बनण्यात येणार फायटर जेट इंजिन
या सामंजस्य करारामध्ये पुढे असे सांगण्यात आले की, आता भारताला जेईचे एफ414 इंजिन तयार करण्याचा परवाना देण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त 8 देशांकडे F 414 इंजिन वापरण्याचा परवाना आहे. आता या यादीत भारताचाही समावेश झाला आहे.
PM Modi US Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) चार दिवसांच्या अमेरिका (America) दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि जनरल इलेक्ट्रिकचे अध्यक्ष एच लॉरेन्स कल्प जूनियर यांची आज भेट झाली. या बैठकीनंतर जेट इंजिनांबाबत ऐतिहासिक करार जाहीर करण्यात आला. अमेरिकन कंपनी जनरल इलेक्ट्रिक (जीई) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) यांच्यात हा करार जाहीर करण्यात आल्याची माहिती एरोस्पेस शाखेने दिली. या करारानंतर जेई एरोस्पेस आणि एचएएल मिळून भारतीय हवाई दलासाठी जेट इंजिन बनवणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जनरल इलेक्ट्रिकचे चेअरमन एच लॉरेन्स कल्प ज्युनियर यांच्या भेटीनंतर काही तासांनंतर, जनरल इलेक्ट्रिकने जाहीर केले की, "भारतीय हवाई दलाला जेट इंजिन पुरवण्यासाठी त्यांची कंपनी आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्यात करार झाला आहे." हा पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यातील हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगण्यात येत आहे. या करारामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्य अधिक दृढ होणार आहे. (हेही वाचा - PM Modi Meets Joe Biden, Jill Biden: PM नरेंद्र मोदी आणि जो बिडेन, फर्स्ट लेडी जिल यांच्यात भेट; ग्रीन डायमंड, Sandalwood Box आणि उपनिषदांची प्रत भेट (Watch Video))
हा करार भारतीय वायुसेनेच्या लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट एमके2 प्रोग्रामचा एक भाग आहे. या सामंजस्य करारामध्ये पुढे असे सांगण्यात आले की, आता भारताला जेईचे एफ414 इंजिन तयार करण्याचा परवाना देण्यात आला आहे. आतापर्यंत फक्त 8 देशांकडे F 414 इंजिन वापरण्याचा परवाना आहे. आता या यादीत भारताचाही समावेश झाला आहे.
GE प्रमुख एच. लॉरेन्स कल्प ज्युनियर यांनी कराराला ऐतिहासिक करार असल्याचं म्हटलं आहे. ते पुढे म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि पंतप्रधान मोदी यांच्या समन्वयामुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगले झाले आहेत. या करारामुळे दोन्ही देशांची आर्थिक आणि लष्करी सुरक्षा वाढणार आहे.