Gyanvapi Mosque Case: ज्ञानवापी मशीद प्रकरण पोहोचले सर्वोच्च न्यायालयात; सर्व्हेवर स्थगिती देण्यास न्यायालयाने दिला स्पष्ट नकार

मात्र, न्यायालयाने तातडीने कोणताही आदेश देण्यास नकार दिला आहे.

Supreme Court (Photo Credit - Twitter)

Gyanvapi Mosque Case: वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीतील (Gyanvapi Mosque) सर्वेक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) पोहोचले आहे. सर्वेक्षणाला स्थगिती देण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकाकर्त्याने शुक्रवारी न्यायालयात ही बाब नमूद केली. याचिकाकर्त्याने या प्रकरणावर लवकर सुनावणी घेण्याचे आदेश द्यावेत आणि यथास्थिती कायम ठेवण्याची मागणी केली आहे. मात्र, न्यायालयाने तातडीने कोणताही आदेश देण्यास नकार दिला आहे. न्यायालय आधी या प्रकरणाची फाइल पाहिलं, असं न्यायालयाने सांगितलं आहे.

दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ विभाग) रवी कुमार दिवाकर यांच्या कोर्टाने सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत आयोगाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. अंजुमन इनाझानिया मस्जिद कमिटीतर्फे निःपक्षपातीपणा नसल्याचा आरोप करत, वकील आयुक्त बदलण्याचे आवाहन करण्यात आले. चार दिवस चाललेल्या सुनावणीनंतर त्यांचे अपील फेटाळण्यात आले आणि आयोगाची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. गुरुवारी अधिवक्ता आयुक्त बदलण्याची मागणीही फेटाळून लावली. अजयकुमार मिश्रा हे अॅडव्होकेट कमिशनर म्हणून कायम राहतील, असे स्पष्ट करण्यात आले. त्यांना 17 मे पर्यंत संपूर्ण कार्यवाही अहवाल न्यायालयात सादर करावा लागणार आहे. (हेही वाचा - Inflation Rate Update: महागाई दराने गाठला मागील 8 वर्षांमधील उच्चांक; अन्नधान्य महागाईचा दर 8.38%)

बनारस ज्ञानवापी मशीद सर्वेक्षण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले. या प्रकरणाचा संदर्भ देत याचिकाकर्त्याने या प्रकरणाची सुनावणी लवकरात लवकर व्हावी आणि यथास्थिती कायम ठेवण्यासाठी न्यायालयाकडून आदेश देण्याची मागणी केली. न्यायालयाने तात्काळ कोणताही आदेश देण्यास नकार दिला. कोर्टाने सांगितले की, ते प्रथम केसची फाइल पाहतील.

कोणत्याही ठिकाणी अडथळा निर्माण झाल्यास तो जिल्हा प्रशासनामार्फत दूर करण्यात येईल, असे न्यायालयाने आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे. कुलूप उघडून किंवा तोडून आयोगाची कारवाई पूर्ण करण्याचे अधिकार जिल्हा प्रशासनाला असतील. यादरम्यान अडवणूक करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करा, असा आदेशही न्यायालयाने दिला आहे.

निकाल देणाऱ्या न्यायाधीशांनी सुरक्षेबाबत व्यक्त केली चिंता -

ज्ञानवापी मशीद खटल्याचा निकाल देणारे न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. रविकुमार दिवाकर म्हणाले की, हे साधे दिवाणी प्रकरण असाधारण करून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. भीतीमुळे स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षिततेची चिंता आहे.