Gujarat Accient: गुजरातमध्ये भीषण अपघात! भरघाव ट्रकची कारला जोरदार धडक, 10 जण जागीच ठार
गुजरातच्या (Gujarat) आनंद (Anand) जिल्ह्यातील तारापूर (Tarapur) महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे.
भरघाव ट्रकने दिलेल्या धडकेत (Car-Truck Collision) एका कारमधील 10 जणांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गुजरातच्या (Gujarat) आनंद (Anand) जिल्ह्यातील तारापूर (Tarapur) महामार्गावर हा भीषण अपघात घडला आहे. मृतांमध्ये 9 जण एकाच कुटुंबीयांतील असल्याची माहिती समोर आली आहे. हे कुटुंब सूरत येथून भावनगरसाठी निघाले होते. यावेळी इंद्रनज गावाजवळ त्यांच्या कार आणि ट्रकमध्ये धडक होऊन अपघात झाला आहे. अपघातात मरण पावलेल्यांमध्ये दोन महिला, सात पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. सर्व मृतदेह तारापूर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून एकाच कुटुंबियातील लोक सूरतकडून भावनगरला जात होते. परंतु, आनंद जिल्ह्यातील तारापूर भागात महामार्गावर समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ज्यामुळे मोठी जिवीतहानी झाली. हा अपघात इतका भीषण होता की, यात एकाच कुटुंबियातील 9 जण जागेवरच ठार झाले. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हे देखील वाचा- Nanded Accident: लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने मोठा अपघात; 37 जण जखमी, एकाचा जागीच मृत्यू
ट्वीट-
या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी दु:ख व्यक्त केले आहे. तसेच त्यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी चर्चा केली असून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबाला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. तर, दुसरीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मरण पावलेल्या लोकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.