GST Scam: ईलेक्ट्रॉनिक वे बिल तयार करत 15,000 कोटी रुपयांचा जीएसटी घोटाळा, युपीतून पोलीसांनी १५ जणांना घेतले ताब्यात,

पोलीस आणखी याचा तपास करत आहेत.

15,000 cr GST scam- noida police arrested(Photo Credit- Twittwer @ANI)

GST Scam: नोयडा येथून युपी पोलीसांनी चालकीने जीएसटी 15,000 कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्या प्रकरणात (GST Scam) आणखी तीन जणांना अटक केले आहे.  पोलिस अधिकाराच्या माहितीनुसार ह्या जीएसटी 15,000 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात 15 जण अटकेत आहेत. आरोपी अतुल गुप्ता, सुमित गार्ग, मनन सिंघाल उत्तर प्रदेश येथे राहत्या ठिकाणाहून पोलीसांनी शुक्रवारी यांना ताब्यात घेतले.

आरोपींना अटक केल्यानंतर पोलीसांनी बनावटी सहा फर्म जीएसटी नोंदणी प्रमाणपत्र, बनावटी पावत्या, दोन आधार कार्ड, तीन मोबाईल फोन, दोन आलिशान गाड्या, 42 हजार रुपये कॅश त्यांच्या ताब्यातून जप्त केले आहे.

गेल्या काही दिवसा आधी ह्याच प्रकरणा संबंधी 12 आरोपींना अटक करण्यात आली होती. आणि आता आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला नोएडा पोलिसांनी एका गॅंगचा पर्दाफाश केला. असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. 15,000 कोटी रुपयांची जीएसटी फसवणूक केल्या प्रकरणी आता पर्यंत 15 जण अटकेत आहे. पोलीस यासंदर्भात आणखी तपास करत आहेत.

ह्या घोटाळ्या अंतर्गत हजारो कंपन्याचे नाव नोंदवल्यात आले होते. ह्या कंपनाचा वापर करून त्यांनी ईलेक्ट्रॉनिक वे बिल तयार केले.सरकारकडून ITC मिळवून घेतला. पोलीस अधिकाराने दिलेल्या माहितीनुसार 1 जून रोजी त्यांनी याच प्रकरणी 8 संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आणि एका महिला आरोपीला देखील अटक करण्यात आली. हे मिशन गेल्या 5 वर्षापासून चालू असल्याचे समोर आले आहेत.

ह्या गॅंगने 2600 बोगस फर्म बनवले. त्यानंतर 4 आरोपींनी पकडले. हे मिशन फोडण्यासाठी युपी पोलीसांनी केंद्राच्या मदतीने गुप्तचर संस्था तैनात केली. पोलीसांनी आरोपींवर आयपीसी कलम 420 (फसवणूक), 467, 468 आणि 471 (सर्व खोट्याशी संबंधित), 120 बी (गुन्हेगारी कट रचणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.