अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 मे रोजी पार पडणार GST Council ची बैठक
ही 43 वी जीएसटी काउंसिलची बैठक असणार असून ती व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.
GST Council 43rd Meeting: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांच्या अध्यक्षतेखाली येत्या 28 मे 2021 रोजी जीएसटी काउंसिलची बैठक पार पडणार आहे. ही 43 वी जीएसटी काउंसिलची बैठक असणार असून ती व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. या बैठकीला अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर आणि अर्थमंत्रालयाचे उच्च अधिकारी सहभागी होणार आहेत. राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या अर्थमंत्र्यांव्यतिरिक्त अधिकारी सुद्धा बैठकीला उपस्थितीत राहणार आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये अर्थमंत्री अमित मित्र यांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांना जीएसटी काउंसिल ऑनलाईन पद्धतीने घेण्यासाठी आग्रह केला होता. यासंदर्भात पत्र सुद्धा लिहिले होते.
मित्रा यांनी असे म्हटले की, जीएसटी परिषद प्रत्येक तीन महिन्यातून होते. मात्र गेल्या दोन वेळेस या नियमाचे पालन झाले नाही. या व्यतिरिक्त दोन तिमाहित बैठक ऑनलाईन सुद्धा बोलावण्यात आली नव्हती. अमित पत्रा यांनी पुढे असे म्हटले की, या कारणामुळे फेडरल संस्था कमकुवत होत आहे. त्यामुळे नियमित रुपात बैठक आयोजित करण्यात न आल्यास विश्वास सुद्धा ढासळू शकतो. तर गेल्या वर्षातील ऑक्टोंबर महिन्यातील जीएसटी काउंसिलचे महत्व कायम ठेवण्यासाठी ऑनलाईन बैठक बोलावली पाहिजे.(PM Kisan Samman Nidhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'पंतप्रधान किसान सन्मान निधी'चा आठवा हप्ता जाहीर केला; 'या' मार्गाने तपासा रक्कम)
Tweet:
दुसऱ्या बाजूला तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम से स्टालिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, कोरोना लस आणि त्या संबंधित औषधांच्या खरेदीवर जीएसटी कपात करुन शून्य करण्याची मागणी केली आहे. तर जीएसटी काउंसिलचा सल्ला घेतल्यानंतर जीएसटीचे दर कमी करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.